वघाळा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन

227

जगतगुरु संत तुकाराम महाराज सेवा मंडळ आरमोरीचा पुढाकार

बहुसंख्य गुरूदेव भक्त उपस्थित

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली): जगतगुरु संत तुकाराम महाराज सेवा मंडळ आरमोरी, जिल्हा गडचिरोलीच्या वतीने नजीकच्या नवीन वघाळा येथील समाज मंदिरात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५५ व्या पुण्यतिथीनिमित्त २नोव्हेंबर २०२३रोजी पुर्णाकृती पुतळ्याचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.

याप्रसंगी मंडळाचे मार्गदर्शक देविदास चेटुले, अध्यक्ष महेश तितीरमारे व सचिव तथा विधायक दीपस्तंभ न्यूजचे संपादक विलास गोंदोळे यांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या अध्यात्मिक, सांस्कृतिक, स्वातंत्र्य समराच्या कालखंडातील व्यापक कार्याबद्दल तसेच ग्रामविकास ते देशविकास याबाबत राष्ट्रसंतांनी स्वरचित ग्रामगीता अध्यायात केलेले प्रबोधन याविषयी मार्गदर्शन केले.त्याचप्रमाणे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामविकास व स्वावलंबनाचे विचार गावखेड्यापर्यंत पोहचविण्याचे कार्य करण्याचा यावेळी संकल्प केला.

यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाज मंदिराचे अध्यक्ष पटवारी दोनाडकर महाजन, गुरूदेव भक्त शंकरराव राऊत,रंधये ,सुकरू दोनाडकर महाजन तसेच जगतगुरु संत तुकाराम महाराज सेवा मंडळाचे उपाध्यक्ष भुवनेश्वर सेलोकर, सहसचिव अंकुश गाढवे, संचालक विजय गोंदोळे, मधुकर राघोर्ते, गणेश तिजारे,डिमराज सपाटे आदी तसेच बहुसंख्य गुरूदेव भक्त, महिला व बालके उपस्थित होते.

सामुदायिक प्रार्थनेनंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.