आरमोरीत ध्वजवंदन व शमीपूजन उत्साहा
जगतगुरु संत तुकाराम महाराज सेवा मंडळाचा अभिनव उपक्रम
बहुसंख्य समाजबांधव उपस्थित
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली): येथील जगतगुरु संत तुकाराम महाराज सेवा मंडळाचे वतीने खास दसरा व विजयादशमी उत्सवानिमित्त सिताबर्डी (आरमोरी) परिसरात समाजबांधवांचे उपस्थित ध्वजवंदन व शमीपूजन उत्साहात पार पडले.
सर्व प्रथमतः मंडळाच्या सदस्या तथा नगरसेविका गीताताई सेलोकर,सौ.लक्ष्मीताई मने,सौ.रत्नाताई बोरकर,सौ.संध्याताई टिचकुले यांच्या हस्ते जगतगुरु संत तुकाराम महाराज व रयतेचे कल्याणकारी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर सेवा मंडळाचे सेवाधिकारी तथा अध्यक्ष महेश तितीरमारे यांचे मार्गदर्शनाखाली सामुहिक ध्वजवंदन करण्यात आले.
याप्रसंगी मंडळाच्या सेवाधिकारी तथा महिला सदस्या सौ.लक्ष्मी मने यांनी दसरा, विजयादशमी उत्सवाचे महत्व व आपली जबाबदारी याबाबत मत व्यक्त केले.तर सेवाधिकारी तथा कोषाध्यक्ष शंकरराव बोरकर यांनी दृष्ट,कपटी,असत्य,दुर्गुण यांसारख्या प्रवृत्तींचा नायनाट करावा व सकारात्मक बदल घडवून मानवी जीवनाचे कल्याण करावे असे आवाहन केले.
यावेळी कार्यक्रमाला मंडळाचे सेवाधिकारी तथा उपाध्यक्ष भुवनेश्वर सेलोकर, वामनराव सेलोकर, विजय गोंदोळे, काशिनाथ पोटफोडे, वामनराव शेंडे, प्रसिध्दी प्रमुख गुलाब मने,अॅड हिवराज बोरकर,विलास पोटफोडे,डिमराज सपाटे,संजय डोकरे, मधुकर राघोर्ते,रवी मने, देविदास चेटुले, बोरकर,पोटफोडे व महिला भगिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन मंडळाचे सेवाधिकारी तथा सचिव विलास गोंदोळे यांनी केले.
यशस्वीतेसाठी मंडळाचे सेवाधिकारी तथा सहसचिव अंकुश गाढवे व समाजबांधव यांनी अथक परिश्रम घेतले.
उपस्थितांना प्रसादाचे वितरण करून ‘जगतगुरु संत तुकाराम महाराज की जय’च्या घोषणा देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.









