जगद्गुरू संत तुकाराम महाराज बहुउद्देशीय सेवा मंडळाचा पुढाकार
बहुसंख्य पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी, जिल्हा गडचिरोली, दि. 5 मार्च 2026 :जगद्गुरु संत तुकाराम महाराज बहुउद्देशीय सेवा मंडळ आरमोरी जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने संत तुकाराम बीज प्रित्यर्थ मंडळाचे पदाधिकारी तथा समाज बांधवांच्या उपस्थितीत दिनांक पाच मार्चला आरमोरी येथे संत तुकारामाच्या प्रतिमेचे मान्यवरांचे हस्ते विधिवत पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.
तसेच यावेळी मंडळाचे अध्यक्ष महेश तितीरमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून अभिवादन करण्यात आले .
उपस्थित पदाधिकारी यांनी संत तुकाराम महाराज कार्यकाळातील साडेचार हजार वरून अधिक अभंग रचली याची माहिती दिली. तसेच संत तुकाराम महाराज हे सर्व समावेशक होते. त्यांनी आयुष्यभर समता सत्य प्रेम सहिष्णुता याचा अंगीकार केलेला होता. तसेच ते समाज प्रबोधन करताना परखड शब्दांचा वापर करायचे तर चर्चा करताना मृदू शब्दांचाही आधार घ्यायचे असे त्यांच्या विविध अभंगातून दिसून येते, असे याप्रसंगी मान्यवरांनी सांगितले .
कार्यक्रमाला आरमोरी न. प.चे सभापती तथा मंडळाचे कार्याध्यक्ष राहुल तितिरमारे, मंडळाचे सचिव विलास गोंदोळे,उपाध्यक्ष भुवनेश्वर सेलोकर, कोषाध्यक्ष शकर बोरकर,नगरसेवक सौ. मेघाताई मने,संचालक लक्ष्मीताई मने,मधुकर राघोर्ते,रत्ना बोरकर,गणेश तिजारे,अंकुश गाढवे,विजय गोंधोळे, डिमराज सपाटे,जेष्ठ समाज बांधव काशिनाथ पोटफोडे, वामन भोयर, देविदास चेटुले, महेंद्र शेंडे,नितीन सपाटे, विलासराव पोटफोडे, बान्ते, प्रशांत दोनाडकर दुर्गा पोटफोडे व
बहुसंख्य समाजबाधव उपस्थित होते.
संत तुकाराम महाराज यांची आरती करून प्रसादाचे वाटप करण्यात आले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज बांधवांनी सहकार्य केले.









