आरमोरीत श्री संत नगाजी महाराज यांची पुण्यतिथी ८ आॅक्टोंबरला

59

विविध कार्यक्रमांचे आयोजन

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली),दि.८ आॅक्टोंबर २०२५:श्री संत नगाजी महाराज,हे विदर्भातील एक महत्त्वपूर्ण संत व आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.त्यांचे कार्य विदर्भातील बहुसंख्य जिल्ह्यात पसरलेले आहे.ते नाभिक समाजाचे आराध्य दैवत मानले जाते.दरवरर्षीप्रमाणे यंदाही आरमोरी तालुक्यातील नाभिक समाजाच्या वतीने दिनांक ८ आॅक्टोंबर २०२५ रोजी आरमोरी -वडसा रोडवरील कोसा प्रकल्पाचे समोर नियोजित स्थळी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन महाराजांची पुण्यतिथी साजरी केली जाणार आहे.

महाराजाची वर्धाच्या हिंगणघाट तालुक्यातील पारडी येथे भव्य समाधी आहे.त्यांच्या पालख्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त काढण्यात येते.श्री संत नगाजी महाराजांनी केलेल्या भजनांचा आणि भक्तींमुळे ते सुप्रसिद्ध झाले.

महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यात सकाळी 11 वाजता भजन,गोपालकाला,व दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात येत आहे.

सदर कार्यक्रमास समस्त नाभिक समाज बांधव व निमंत्रीतांनी उपस्थित राहुन सहकार्य करावे.असेआवाहन नाभिक समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष,सचिव व इतर पदाधिकारी तसेच सलुन दुकान संघटना अध्यक्ष, सचिव व इतर पदाधिकार्यांनी केले आहे .