आरमोरी नवरात्र उत्सव:विविध कामे करून स्काउट्स गाईड पथकाने केले सहकार्य!

59

महात्मा गांधी स्काउट्स गाईड पथकाचे अनोखे सेवाकार्य 

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली)दि.२७ सप्टेंबर २०२५:आरमोरी येथील नवरात्र उत्सव जिल्ह्यात नव्हे संपूर्ण विदर्भात नावारूपाला आला आहे. आरमोरी नगरीत विविध चौकात दुर्गामाता व शारदामातेची प्रतिष्ठापना करून देवीची आराधना केली जाते. त्यातच दुर्गामाता मंदिर टिळक चौक येथील दुर्गामाता ही अनेक वर्षापासून भाविकांचे श्रद्धास्थान आहे.नवरात्रात अनेक भाविक पूजेसाठी दर्शनासाठी येत असतात .मंदिरातील संचालक मंडळाला भाविकांच्या व्यवस्थेचे तसेच परिसर स्वच्छतेत मदत व्हावी यासाठी महात्मा गांधी विद्यालय आरमोरी येथील गाईड पथकाच्या वतीने दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोज शुक्रवारला व्याख्यानाजोगा कार्यक्रम घेण्यात आला.तसेच मंडळाला स्वयंसेवी पध्दतीने स्काउट्स गाईड पथकाने मोलाचे योगदान देऊन सहकार्य केले.

याप्रसंगी विद्यालयातील गाईड पथकाच्या चमूने गाईड शिक्षिका कु.जे. पी.धाईत यांच्या नेतृत्वाखाली मंदिराच्या परिसरातील निर्माल्य कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. दुर्गामातेच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होत असल्यामुळे भाविकांना व्यवस्थित रांगेत सोडून प्रत्येकाला दर्शन घेता येईल यासाठी मदत केली . तसेच भाविकांच्या अवास्तव पडलेली पादत्राणे व्यवस्थित रांगेत लावून ठेवण्याचे कार्य सुद्धा गाइड पथकाने केले. महिला भक्तांनी मातेला भरलेल्या ओटीतील साहित्य वेगवेगळे करण्यासाठी मंडळातील सदस्यांना मदत केली.

सदर विविध उपक्रमाची कार्यवाही शाळेचे प्राचार्य साईनाथ अद्दलवार ,उपमुख्याध्यापक श्री गुंफावार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

यशस्वीतेसाठी दुर्गामाता संचालक मंडळाचे संचालक तुळशिराम गोंडोले,शंकरराव सातव ,गणेश वणवे,लहुजी दुमाने,प्रतीक भोयर,श्री.सेलोकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

सदर यशस्वी उपक्रमाचे आरमोरीकर जनता व भाविक भक्त कौतुक करीत आहेत.