Excellent activity : राम मंदिर गणेश उत्सव मंडळाच्या ५३ व्या वर्षपूर्ती निमित्ताने केले रक्तदान

149

मंडळाच्या सामाजिक उपक्रमाचे आरमोरीकर व जिल्हावासीय जनता करताहेत कौतुक!

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली),दि.३सप्टेंबर : महाराष्ट्र राज्यात सध्या गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात असून आरमोरी शहरात देखील विविध प्रभाग( वार्डा )मध्ये गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. गणेश उत्सवाच्या निमित्ताने विविध मंडळ झाकी च्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवून एक चांगला संदेश गणेश उत्सवाच्या निमित्ताने देण्याचा प्रयत्न करीत आहेत. असाच एक उत्कृष्ट उपक्रम आरमोरी शहरातील राम मंदिर वार्डात राबविण्यात आला आहे.

या मंडळातर्फे वर्षभर विविध सामाजिक, धार्मिक व आरोग्य विषयक कार्यक्रम राबविले जातात. यासाठी आरमोरी शहरात व तालुक्यात राम मंदिर गणेश उत्सव अतिशय प्रसिद्ध मंडळ असून या मंडळाची स्थापना सण 1973 झाली असून सण 1973 पासून गणेश मूर्ती ची स्थापना केली जात असून आज 53 वर्ष पूर्ण झाले आहेत. राम मंदिर गणेश उत्सव मंडळाचे 53 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज दिनांक ३ सप्टेंबर ला रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

गडचिरोली जिल्ह्यात हल्ली रक्ताचा पुरवठा अतिशय कमी प्रमाणात होत असल्यामुळे आजार ग्रस्त व्यक्तींना व रक्तपेढीमध्ये रक्ताची साठवणूक अतिशय कमी प्रमाणात होत आहे. व यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना रक्त दात्यासाठी भटकंती करावे लागत आहे. याची दखल सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ राम मंदिर यांनी घेतली असून आज तीन सप्टेंबरला रक्तदान शिबिराचे आयोजन करून यात बहुसंख्य युवकांनी रक्तदान केले.

३७ रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान 

सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ राम मंदिर हे सतत सामाजिक कामात अग्रेसर राहून शहरात उत्कृष्ट उपक्रम राबवत असल्याने शहरात या मंडळाच्या स्तुत्य उपक्रमाची दखल घेतली जात आहे.
आज करण्यात आलेल्या रक्तदानामध्ये सागर मने माजी बांधकाम सभापती नगरपरिषद आरमोरी , मंगेश मने,प्रदीप गिरडकर, सुनील गरफडे, शुभम भरणे, मंगेश टीचकुले, शुभम पेंदाम, राहुल टीचकुले, संकेत टीचकुले, मुकेश टीचकुले, प्रशांत गोन्नाडे, रजत बोन्द्रे, अक्षय हेडवू, आशिष बुराडे, साई कापकर, छबिल ठाकरे, कुलदीप कुकडकर, हेमंत निपाने, सुभाष चौधरी, दीपक सेलोकर, श्रेयस सिद्दमवार, सौरभ खापरे, अरविंद डुंबरे, लोमेश मुरवतकर, हेमंत इंदूरकर, निखिल धार्मिक आदी रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक उपक्रमात आपला सहभाग नोंदविला.हे विशेष!