स्व. वत्सलाबाई वनमाळी यांची जयंती उत्साहात

77

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी( जिल्हा गडचिरोली): स्थानिक वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्कॉलर्स, आरमोरी येथे दिनांक 25ऑगस्ट 2025 रोजी स्वर्गीय वत्सलाबाई वामनरावजी वनमाळी यांची जयंती साजरी करण्यात आली.

याप्रसंगी विद्येची देवता माता सरस्वती व स्व. वत्सलाबाई वनमाळी यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.

विद्यालयातील अध्यापिका सौ. प्रियंका अमित मैंद यांनी स्व. वत्सलाबाई वनमाळी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. विद्यालयाची इयत्ता 7 वी ची विद्यार्थिनी कुमारी. तृष्णा मंगेश मेश्राम ने ही आपले मनोगत याप्रसंगी व्यक्त केले.

इयत्ता नर्सरी ते इयत्ता 10वी पर्यंत चे सर्व विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते.

आपल्या देशाला लाभलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यासारख्या थोर महापुरुषांना आदर्श मानून त्यांच्या विचानुरूप वाटचाल करून आदर्श प्रस्थापित करणाऱ्या स्व. वत्सलाबाई वनमाळी यांच्या जयंतीप्रित्यर्थ सर्वांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे प्राचार्य नितीन कासार, सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन कुमारी गायत्री बिडवाईकर यांनी केले. तसेच सौ. सविता पानसे यांनी सरस्वती स्तवन केले.

उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना जयंती निमित्त खाऊचे वितरण करण्यात आले.

राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.