अनोखा सोहळा ; ‘कस्तुरी’ गृपचा श्रावणी मेळा!

180

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली):आरमोरी येथील महिला कस्तुरी भिसी गृपचे वतीने श्रावणी मेळा मोठ्या उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला.

भारतीय व हिन्दु परंपरेनुसार हा मेळा भगवान शिवाला समर्पित आहे. श्रावण महिन्यात अनेक सण साजरे केले जातात, या अनुषंगाने भिसी गृपद्वारा,श्रावण मासारंभातील सण जसे शिवपुजन, दिपपुजा,नागपंचमी,रक्षाबंधन, संकटचतुर्थी ,स्वातंत्र्यदिन,गोपाळकाला(कृष्णजयंती),बैलपोळा आदींचे प्रतिकृतीची सजावट केली.

तसेच सामाजिक जाणिवेतून सामाजिक कार्यात महत्वपूर्ण योगदान देणारी विद्यार्थीनी कु. नम्रता जुआरे,हिला भेट वस्तु देऊन सत्कार करण्यात आला.

त्याचप्रमाणे ‘तुळस’ आरोग्य दृष्टीने नवसंजीवनी देते;तरी प्रत्येकांनी पर्यावरण पुरक तुळशीचे झाड घरी लावा व पर्यावरण वाचवा अशी संदेशात्मक कृती,एका कुंडीत सामुदायिकपणे तुळशीचा पौधा लावून केली.

सदर मेळा मध्ये विविध पारंपारिक खेळ, श्रावण पाळण्याचे झोपाळे व विविध स्पर्धा घेण्यात आले.

श्रावणी मेळ्याचे आयोजन व संचालन वंदना जुआरे यांनी केले.

यशस्वीतेसाठी रजनी किरणापुरे,साधना दहिलेकर,प्रिती भोयर, रंजना गौतम ,वंदना जुआरे,ममता धकाते,बाबी खरवडे,चन्द्रकला तिजारे, मनिषा मस्के,वर्षा तिजारे,सपना मने ,माधुरी ठवकर व इतर भिसी गृप सदस्यांनी केले.