फोटो स्टोरी
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी/नवीन वघाळा (जिल्हा गडचिरोली) येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने दिनांक २६ जून २०२५ रोजी दिवंगत निलकंठराव दोनाडकर साहेब यांच्या नवीन वघाळा येथील ‘राजर्षी ‘ निवासस्थानी विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क चे संपादक विलास गोंदोळे व सामाजिक विचारवंत प्रा.प्रशांत दोनाडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी मान्यवरांनी राजर्षी शाहू महाराजांचे वैचारिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रातील कार्य हे सुधारणावादी अंगार आहेत. वर्तमान परिस्थितीत त्याची नितांत आवश्यकता आहे.त्यांच्या अमर्त्य विचारांचा वारसा चालविणे हीच राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी आदरांजली ठरेल असे प्रतिपादन केले.ते अनमोल क्षण कॅमेरात कैद केले आहे ‘विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा टीम’ ने!









