आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांचे प्रेरणादायी प्रतिपादन
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली:- जागतिक योग दिनानिमित्त (दिनांक २१ जून २०२५)भारतीय जनता पार्टी, गडचिरोली शहराच्या वतीने कॅम्प एरिया येथील हनुमान मंदिर प्रांगणात भव्य योग सत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
सर्वप्रथमत कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर कुशल योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम व ध्यान सत्र पार पडले.
यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी जिल्हावासीयांना योगाचे महत्त्व पटवून देत प्रेरणादायी संदेश दिला. त्यांनी “योगः कर्मसु कौशलम्” – योग म्हणजे प्रत्येक कृतीत कौशल्य या भगवद्गीतेतील श्लोकाचा संदर्भ देत सांगितले की,
“योग हा केवळ शरीर सशक्त करणारा मार्ग नाही, तर मन, आत्मा आणि जीवनशैली यांच्यात समतोल साधणारा प्रभावी उपाय आहे. आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा नियमित समावेश केल्यास तणावमुक्त, आरोग्यपूर्ण व सकारात्मक जीवन शक्य आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
तसेच त्यांनी पुढे सांगितले की, “योगामुळे मन:शांती, आत्मविश्वास व ऊर्जा प्राप्त होते. व्यस्त जीवनशैलीत थोडेसे वेळ काढून केलेला योग आयुष्याचा संपूर्ण दृष्टिकोन बदलू शकतो. म्हणून प्रत्येक नागरिकाने योग हे आपले नित्यकर्म बनवावे,” असे आवाहनही त्यांनी जिल्हावासीयांना केले.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने माजी खासदार डॉ. अशोक नेते, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी,ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेश भुरसे,आदिवासी आघाडी चे जिल्हा प्रमुख डॉ. नितिन कोडवते,डॉ. चंदाताई कोडवते, समन्वयक प्रमोद पिपरे,जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी,जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,जिल्हा महामंत्री गोविंद सारडा,जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे,ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, कामगार आघाडी प्रदेश सचिव गोवर्धन चव्हाण, शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर पेटकर,वर्षा शेडमाके,अल्का पोहनकर,सिमा कन्नमवार,अर्चना चन्नावार, सचिनभाऊ तंगडपल्लीवार, अविनाश महाजन, विनोद देवोजवार,श्याम वाढई, मधुकर भांडेकर,हर्षल गेडाम,गुड्ड सरदार, प्रा.उराडे ,नरेश हजारे,राजु शेरकी,केशव निंबोड, यांच्यासह योग दिनाला अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते,योगप्रेमी नागरिक, बंधू भगिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.









