दिव्य अखंड ज्योत कलश यात्रा
आरमोरीत भक्तीमय वातावरणात स्वागत
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली):आरमोरी तालुक्यात गुढीपाडव्याच्या पुर्व संध्येला 29 मार्च रोजी येथील दत्त मंदिर देवस्थानात कलश यात्रेचे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले.आरमोरीच्या तहसीलदार उषाताई चौधरी यांनी कलश पुजन करून भाविक जनतेच्या सुख समृध्दीसाठी प्रार्थना केली. तत्पूर्वी दत्त मंदिर देवस्थानच्या अध्यक्ष तथा माजी जि. प. सदस्या सौ लक्ष्मीताई मने यांनी कलश पूजन केले.
याप्रसंगी योगगुरु सत्यनारायन चकीनारपुवार, सराफा असोसिएशनचे माजी अध्यक्ष विजयभाऊ खरवडे,दिपकभाऊ बेहरे,महेंद्र शेन्डे,भुवनेश्वर सेलोकर , जेष्ठ पत्रकार गंगाधरराव जुआरे, पत्रकार विलास गोंदोळे, राहुल तितिरमारे,नानाजी चोपकार, प्रमोद सेलोकर, बंडुजी डोकरे,वामन शेन्डे,अरविंद मने,रमेश गोंदोळे,भाऊराव हेमके तसेच इतर प्रतिष्ठित व्यवसायिक ,मान्यवर व गायत्री परिवारातील साधकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भक्तिमय वातावरणात कलश पूजनानंतर दत्त मंदिर देवस्थान येथे भाविकांना मार्गदर्शन गायत्री जिल्हा समन्वयक नारायणराव वैद्य यांनी केले.त्यांनी दिव्य अखंड ज्योत कलशाची महती विशद केली.तसेच अवकाश वेळा मध्ये गायत्री परिवारातील महिला साधक वर्गानी भजन गायन केले.
संचालन महादेव माकडे यांनी केले.तसेच तालुक्यातील विविध गावांमध्ये सदर कलश यात्रा मार्गक्रमणासंबंधी माहिती दिली.प्रास्ताविक देविदास चेटुले यांनी केले.
यशस्वीतेसाठी गायत्री परिवारातील सर्व साधक वर्गातील महिला पुरुष आदींनी परिश्रम घेतले.