विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली)/दि.२८:दिव्य ज्योत कलश यात्रेचे आरमोरी तालुक्यातील आरमोरी शहरात गुढीपाडव्याच्या पुर्वसंध्येला दि.२९ मार्चला दुपारी ठीक १ वाजता दत्त मंदिर देवस्थान सिताबर्डी (आरमोरी) येथे आगमन होत आहे.
भविष्यात येणारा युग हा सत्य युगाचा असेल सत्य युगाच्या निर्मितीचा संकल्प भगवान महाकाल शंकराचा आहे. तो साकार करण्यासाठी व तपसाधनेचे माध्यम म्हणून सप्तऋषीच्या सूक्ष्म साक्षीने 1926 मध्ये युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांनी अखंड दिव्य ज्योतीचे प्रज्वलन करून गायत्री परिवाराची स्थापना केली. त्या अखंड दिव्य ज्योतीला सन 2026 मध्ये 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्य सत्ययुगाचा युग संदेश आणि युगनिर्माणाची प्रेरणा व ऊर्जा प्रत्येक मानवाला मिळावी, याकरिता अखिल विश्व गायत्री परिवारातर्फे दिव्यचेतना ज्योती रूपात असलेल्या व नवयुगाचा संकल्प घेतलेल्या भगवान शिवपार्वतीचे ज्योती रूपाने दर्शन अखिल मानवाला करता यावे, याकरिता दिव्य ज्योती कलश यात्रा भारत भ्रमण करीत आहे.
तरी सर्व भाविक भक्तांनी ज्योती कलश यात्रेच्या स्वागत व दर्शनाकरिता उपस्थित राहावे असे आवाहन सर्व जनतेला आरमोरीकर गायत्री परिवारातर्फे करण्यात आले आहे.
@आरमोरी तालुक्यातील ज्योती कलश यात्रेचा भ्रमण मार्ग
#दिनांक 29 मार्च 2025 ला दुपारी 3.00 वाजता वघाळा (जुना ),
दुपारी 4.00 वाजता सायगाव, सायंकाळी 5.00 वाजता शिवनी (बुज)येथे दीप महायज्ञ रात्री 8.00 वाजेपर्यंत.
#दिनांक 30 मार्च 2025 ला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर
शुभ सकाळी 6.00 ते 7.30 वाजेपर्यंत शिवनी ग्राम दर्शन सोहळा.
सकाळी 9.00वाजता डोंगरगाव,
10.00 वाजता ठाणेगाव,
10.30 वाजता वासाळा,
11.00 वाजता वनखी, दुपारी12.30 वाजता वैरागड,3.30 वाजता शंकरनगर,4.00 वाजता पाथरगोटा, 4.30 वाजता पळसगाव,5.15 वाजता जोगीसाखरा,
सायंकाळी 6.00 वाजता रामपूर, 6.30 वाजता अंतरजी,
7.00 वाजता आरमोरी दीप महायज्ञ 8.30 वाजेपर्यंत .
# दिनांक 31 मार्च 2025 ला सकाळी 8.00 ते 12.00 वाजेपर्यंत आरमोरी शहर ज्योती दर्शन भ्रमण सोहळा,
दुपारी 12.15 वाजता गडचिरोली कडे ज्योती कलश यात्रेचे प्रस्थान होणार आहे.
———————————-