तालुका माळी समाज संघटनेचे पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली )- : ज्ञानजोती सावित्रीबाई फुले स्मृती दिन व जागतिक महिला दिनानिमित्ताने दिनांक 10 मार्चला आरमोरी येथे माळी समाज संघटना आरमोरी च्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रतिभाताई नंदरधने ,महिला तालुका अध्यक्षा ,रणजित बनकर तालुका अध्यक्ष,भिमराव पात्रीकर, अभिमन्यू निकुरे, गुरुदास बोरुले आरमोरी आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथमत: ज्ञानजोती सावित्रीबाई फुले
व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून, आदरांजली वाहिली.
यावेळी प्रतिभाताई नंदरधने उपस्थितांना मार्गदर्शन करताना महिला दिनाच्या शुभेच्छा देत म्हणाल्या की,आजच्या युगात स्त्री पुरुषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून नव्हे तर त्यांच्यापुढेही दोन पावले जात आहे. शैक्षणिक, क्रीडा, आर्थिक, राजकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी झेप घेत आहे. यापूर्वीही व आजही देशाची राष्ट्रपती ही महिलाच आहे.अर्थमंत्री ही महिलाच आहे.आकाशात उंच झेप घेणारी कल्पना चावला, इतर क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहे.हे केवळ आणि केवळ फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळे शक्य झाले आहे.त्यांनी जर महिलांना शिक्षण दिले नसते तर त्या इथं पर्यंत पोहोचू शकल्या नसत्या.महिलांनी स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यायला हवे.असा मोलाचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
कार्यक्रमाला उपस्थित मंगलदास कोरंगे, सुरेश वाडगुरे ,मिलींद वाढई ,खुशाल गायधने,वनिता तोरनकर, रूपाली बनकर,श्रेया कोटरंगे, आरती लठ्ठे, निलीमा गावतुरे ,सुनीता बनकर, मंजुषा बनकर ,साधना कोटरंगे ,रुपाली मने, बांडे,नलिनी उपरिकर, खुलाबाई आंबेकर , गिता ठाकरे, क्रांती बोरुले ,श्रध्दा कोटरंगे, गुरुनुलेताई ,निकेसर , लोमेश कोटरंगे , विठ्ठले,व्यंकट कोटरंगे ,बाबुराव जेंगठे,चंदु मोहुर्ले, अजय वाडगुरे आदी माळी समाजातील बांधव व माता-भगिनी उपस्थित होत्या .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचदेव मोहुर्ले यांनी केले व आभार प्रदर्शन सिंधुताई जेंगठे मॅडम यांनी मानले.