कुळवाडी भूषण छत्रपती शिवरायांना अभिवादन

234

जगतगुरु संत तुकाराम महाराज बहुउद्देशीय संस्था पदाधिकारी उपस्थित

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली): जगतगुरु संत तुकाराम महाराज बहुउद्देशीय सेवा मंडळ आरमोरीच्या वतीने कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती स्व.निर्धनराव वाघाये पाटील शिक्षण महाविद्यालय आरमोरी बर्डी येथे दिनांक १९ फेब्रुवारीला उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रथमतः रयतेचे राजे छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेला मंडळाचे अध्यक्ष महेश तितीरमारे यांनी माल्यार्पण केले.तर संचालक सौ. रत्ना बोरकर यांनी दिपप्रज्वलन केले.

याप्रसंगी मंडळातील पदाधिकारी व संचालकांनी छत्रपती शिवराय यांचे कार्य हे शिवकार्य आहे.ते समाजातील सर्व घटकांना प्रेरणादायी आहे.त्यांच्या अद्वितीय व अजरामर कार्यातून प्रेरणा घेऊन सदैव मार्गक्रमणा करण्याचा संकल्प केला.

यावेळी कार्यक्रमाला मंडळाचे उपाध्यक्ष भुवनेश्वर सेलोकर, सचिव विलास गोंदोळे, संचालक मधुकरराव राघोर्ते, गणेश तिजारे , सहसचिव अंकुश गाढवे तसेच प्रसाद सपाटे,प्रा.वाढई,प्रा.रहाटे,लिपीक कोहाडे,जियाजी पठाण आदी उपस्थित होते.