श्रध्दा, भक्ती व अखंड नाम जपाचा दुर्मिळ योगायोगच!

452

 

फोटो स्टोरी

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आज दिनांक ३ आॅक्टोंबर २०२४च्या सकाळच्या प्रहरापासूनच आगमनाची प्रतिक्षा करीत असलेल्या आरमोरीकर व परिसरातील भाविक भक्तांची आदीशक्ती,रणचंडिका,असूर संहारक, महिषासुरमर्दिनी दुर्गादेवी.. विदर्भात प्रसिद्ध असलेला आरमोरीकरांचा २०२४ चा नवरात्र उत्सव… यानिमित्ताने आरमोरी बस स्टँड दुर्गा मंडळाची ‘घटस्थापना’ व ‘दुर्गा माता मुर्ती आगमन रॅली’….. ढोल ताशा पथक, भक्तीगीत,भजन ,गायन वादन या भक्तिमय वातावरणात थिरकणारी तरूणाई… आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील कनकमाता मंदिरातून आणलेल्या ज्योत दर्शनासाठी आसुसलेली भाविक भक्तांची गर्दी… त्रिभुवनात एकमेव असलेल्या नवरात्रभर आरमोरी व परिसरातील भाविक भक्त गणांच्या मनात विराजमान झालेल्या,प्रसन्नवदन लाभलेल्या दुर्गामातेच्या दर्शनासाठी….’जय माता दी’ चा गजरात तल्लीन झालेले…..व ‘अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा…..’ म्हणणा-या,भक्तीरसात ओथंबलेल्या सानथोर यांचे छायाचित्रण कॅमे-यात कैद केले आहे,’ विधायक दीपस्तंभ न्यूज’ नेटवर्क चे संपादक विलास गोंदोळे यांनी…. बघूया एक झलक!