भाविक भक्त व नागरिकांनी घेतला लाभ
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी(जिल्हा गडचिरोली):हनूमान जयंतीच्या पावनपर्वावर दी. 23-04-2024 मंगळवारला पंचमूखी सार्वजनिक हनूमान मंदीर बाजार वार्ड, आरमोरी येथे सामाजिक कार्यकर्त्यां विभा ईश्वर बोबाटे यांचेकडून महाप्रसाद वाटप करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही आरमोरी शहरातील विविध भागात श्रीराम भक्त हनुमानजी यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी शहरातील बाजारपेठ वार्डातही जन्मोत्सव साजरा केला.त्यावेळी सतत सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या विभा ईश्वर बोबाटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अन्नदानाचे वितरण केले.या महाप्रसादाचा भावीक भक्तांनी लाभ घेतला.
यावेळी विभा बोबाटे, स्नेहल बोबाटे, दिव्यानी बोबाटे , अर्चना ढेगळें , शिला पेदाम , कूकूडकर ताई , साईनाथ नैताम , अल्पेश कूकूडकर , विशाल मेश्राम, आशिष चापले , गणेश भाऊ व मंडळातील ईतर कार्यकर्ते आदी नी उपस्थित राहून सहकार्य केले.
भाविक भक्त व नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला व आयोजकांचे नि:स्वार्थ, निष्काम सेवेबद्दल आभार मानले.









