भाविक भक्तांनी घ्यावे दर्शन!
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली):येथील श्रीराम स्वामी देवस्थान आरमोरी व्दारा आयोजित श्रीराम नवरात्रोत्सवात येथील 71 रामभक्त अयोध्येवरुन अखंड ज्योत घेऊन येत आहेत.सदर ज्योत यापुर्वी कोणत्याच देवस्थानकडे सूपुर्द करण्यात आलेली नाही,हे विशेष!याचे श्रेय व बहुमान येथील रामभक्त व भाविक भक्तगणांना मिळाला आहे.
तत्पूर्वी अयोध्येला गेलेल्या रामभक्तांचे स्वागत दुप्पटे घालुन अयोध्येच्या मुख्य पुजार्यांकडुन करण्यात आले व प्रथमच अयोध्या अखंड ज्योत मुख्य महंत यांच्याकडुन रामभक्तांकडे सुपूर्द करण्यात आली, हा शुभ प्रसंग रामभक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.सदर ज्योतीचे आगमन दि.9 एप्रिल ला सकाळी 8 वाजता बर्डी येथील श्रीदत्त मंदिर चौकात होईल. तत्पूर्वी बाईक व कार रॅलीने पाचगाव वरुन रामभक्तव्दारा सदर ज्योतीचे आगमन श्रीदत्त मंदिर चौकात होणार आहे.तरी भाविकवर्गांनी ज्योत दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन उत्सव कार्यकारिणी व विश्वस्त मंडळाने केले आहे.









