सोनार समाजाचा पुढाकार
विविध कार्यक्रमांचे आयोजन
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी( जिल्हा गडचिरोली): श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी प्रित्यर्थ सोनार समाज शाखा आरमोरीच्या वतीने दिनांक २७ फेब्रुवारी२०२४ ला आरमोरी येथील साई दामोदर मंगल कार्यालयाच्या सभागृहात नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ९.०० वाजता श्रीराम मंदिर देवस्थान आरमोरी येथून श्री संत नरहरी महाराज यांच्या फोटोची भव्य मिरवणूक व शोभायात्रा व कलश यात्रा निघणार असून दुपारी ११.०० वाजता समाजातील महिलांसाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार आहे.दुपारी १२.०० वाजता उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.
यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून आमदार कृष्णा गजबे तर अध्यक्षस्थानी नागपूर येथील सोनार महिला समाज बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा भाग्यश्री तारेकर तसेच प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष पवन नारनवरे, नागपूर येथील ऋग्वेद सुवर्ण वार्ताहर दिलीप येवले, आरमोरी पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक ज्योती राक्षे,सराफाअसोसिएशन आरमोरीचे अध्यक्ष विजयराव खरवडे, उपाध्यक्ष दीपक बेहरे, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून समाजातील १०वी व इयत्ता १२ वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तर दुपारी २.०० नरहरी महाराज यांच्या जीवनचारित्रावर खुली वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार असून, दुपारी ३.०० वाजता ०२ ते १० वर्षे वयोगटातील सोनार समाजातील मुलामुलींसाठी वेशभूषा स्पर्धा घेण्यात येणार आहे.सायंकाळी ५.०० वाजता भजन, पूजन व गोपालकाला, सायंकाळी ६.०० वाजता महाप्रसाद व सायंकाळी ७.०० वाजता समाजातील मुलामुलींसाठी नृत्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमास सोनार समाजातील सर्व समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सोनार समाज शाखा आरमोरीचे अध्यक्ष पंकज खरवडे, सचिव मदनकुमार काळबांधे,महिला अध्यक्ष प्रीती गजपुरे, युवा अध्यक्ष अंकुश खरवडे, विनोद बेहरे,दिलीप श्रीरंगे,ओंकार इन्कने, प्रफुल खापरे,चंदा खापरे,निर्मला काळबांधे,सुनीता काळबांधे, कविता बेहरे, सविता खापरे,नंदा भरणे आदींनी केले आहे.









