विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली) :मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळ आरमोरी द्वारा संचालित श्रीमती वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्काॅलर्स आरमोरी येथे दोन दिवशीय ( दिनांक ४ व ५जानेवारी ) एंजल बीट्स सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन ठीक ११ वाजता महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरीचे सभागृह येथे करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमास संस्थेचे सचिव मनोजभाऊ वनमाळी तसेच पदाधिकारी,संचालक मंडळी, शिक्षक पालक संघाचे पदाधिकारी,शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकारी तसेच विविध विभागांचे प्रमुख व मान्यवर अतिथी आदी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी कार्यक्रमात शालेय विद्यार्थी विविध प्रकारचे नृत्य,गाणे, एकपात्री नाटक, विविध राज्यांतील वेशभूषा, अध्यात्म, देशभक्ती, शिक्षण, आरोग्य, सांस्कृतिक बाबींवर कला सादर करणार आहेत.यात नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.
उपरोक्त होणाऱ्या कार्यक्रमास स्कूलच्या विद्यार्थी, पालक, शिक्षक,शिक्षिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य नितीन कासार यांनी केले आहे.