बहुजनांचे कैवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली

494

बहुजनांचे कैवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजल

बहुसंख्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली): जगतगुरु संत तुकाराम महाराज सेवा मंडळ आरमोरी जिल्हा गडचिरोली तसेच स्व.निर्धनराव पाटील वाघाये शिक्षण महाविद्यालय आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने बहुजनांचे कैवारी,प्रज्ञासूर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६डिसेंबर २०२३ला स्व.निर्धनराव पाटील वाघाये शिक्षण महाविद्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत आदरांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जगतगुरु संत तुकाराम महाराज सेवा मंडळाचे अध्यक्ष महेश तितीरमारे होते.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सेवा मंडळाचे पदाधिकारी सौ.रत्नाताई बोरकर,सौ.लक्ष्मीताई मने,सौ.संध्याताई टिचकुले,शंकरराव बोरकर, मधुकर राघोर्ते, देविदास चेटुले, गणेश तिजारे, राहुल तितीरमारे, विजय गोंदोळे आदी उपस्थित होते.

सर्वप्रथमता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून काही क्षण मौन पाळून आदरांजली वाहिली.

कार्यक्रमाला उपस्थित मार्गदर्शक शंकरराव बोरकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ओबीसी प्रवर्गाकरिता संविधानात समाविष्ट केलेल्या ३४०व्या कलमाबद्दल विस्तृत माहिती दिली.तर लक्ष्मीताई मने यांनी स्त्रीयांच्या न्याय हक्कासाठी असलेले हिंदू कोड बिल यासंदर्भात विवेचन केले.रत्नाताई यांनी बाबासाहेबांच्या संघर्षाची कहाणी सांगितली.देविदास चेटुले यांनी बाबासाहेबांचे विविध समाजोपयोगी उपक्रम यांची संक्षिप्त माहिती दिली.तसेच अध्यक्ष स्थानावरून बोलताना महेश तितीरमारे म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महामानव भारतीयांमध्ये निर्माण होणे ही आम्हा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.विश्वरत्न बाबासाहेब यांनी दलित, वंचित,शोषित, हीनदीन समाजाचे बौद्धिक नेतृत्व केले.प्रसंगी मोठमोठे आंदोलनही केले.यामुळे समस्त बहुजन समाजाला सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, कृषी, क्रीडा व इतर विविध क्षेत्रात संवैधानिक पदे,नोक-या मिळाल्या आहेत.आजही भारतीय समाजाला त्यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत सहभागी होऊन त्यांचे उरलेले कार्य पूर्ण करणे ही ख-या अर्थाने त्यांना आदरांजली ठरेल असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन सेवा मंडळाचे सेवाधिकारी विलास गोंदोळे यांनी तर आभार सेवाधिकारी अंकुश गाढवे यांनी मानले.

कार्यक्रमाला प्रा.नलेश रहाटे, क्लर्क कोहाडे यांनी सहकार्य केले.