संस्थापक महेशभाऊ तितीरमारे यांचा अभिष्टचिंतन सत्कार सोहळा थाटात

537

जेष्ठ मंडळी, सेवाधिकारी, मित्रमंडळींनी केला शुभेच्छांचा वर्षाव

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली): श्री सत्यसाई आदिवासी ग्रामीण विकास व बहुउद्देशीय शिक्षण संस्था, जगतगुरु संत तुकाराम महाराज सेवा मंडळ आरमोरी व मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने अजातशत्रू शिक्षणसम्राट महेशभाऊ बाळासाहेब तितीरमारे यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सत्कार सोहळा दिनांक १८नोव्हेंबर २०२३ रोजी आरमोरी येथील निर्धनराव पाटील वाघाये शिक्षण महाविद्यालयात मान्यवरांच्या शुभेच्छांच्या वर्षावात थाटात पार पडला.

सर्व प्रथमतः उपस्थित मान्यवरांनी माता सरस्वती व जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले.जगतगुरू संत तुकाराम महाराज सेवा मंडळाचे पदाधिकारी यांनी मंडळाचे अध्यक्ष तथा शिक्षण संस्था सचिव महेशभाऊ यांचा शाल, श्रीफळ व डायरी लेखणी देऊन सहृदय सत्कार केला.त्यानंतर महेशभाऊ तितीरमारे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी विचार मंचकावर विशेष अतिथी म्हणून माजी आमदार आनंदराव गेडाम, सत्कारमूर्ती महेशभाऊ तितीरमारे,प्रा.सरलाताई महेशभाऊ तितीरमारे, मातोश्री हिराबाई बाळासाहेब तितीरमारे, गीताबाई अभिमन्यू तितीरमारे,जगतगुरु संत तुकाराम महाराज सेवा मंडळाचे उपाध्यक्ष भुवनेश्वर सेलोकर, कोषाध्यक्ष शंकरराव बोरकर, संचालक मधुकर राघोर्ते, मार्गदर्शक देविदास चेटुले, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी सलाम, श्री दत्त मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष लक्ष्मीताई मने, जगतगुरु संत तुकाराम महाराज सेवा मंडळाचे सचिव तथा विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क चे संपादक विलास गोंदोळे, सहसचिव अंकुश गाढवे, प्रसिद्धीप्रमुख गुलाब मने, कार्याध्यक्ष राहुल तितीरमारे,विजय गोंदोळे,सौ.रत्नाताई बोरकर,सौ.संध्याताई टिचकुले,अॅड.हिवराज बोरकर, गणेश तिजारे,डिमराज सपाटे,सामाजीक कार्यकर्ते हिरालाल वालदे, छगन हेडाऊ,सारंग जांभुळे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या व महेशभाऊ तितीरमारे यांचा जीवनप्रवास बद्दल मार्मिक माहिती दिली.

सत्काराला उत्तर देताना महेशभाऊ तितीरमारे म्हणाले की, आरमोरीकर जनता जनार्दन, आमचे हितचिंतक, सेवाधिकारी तसेच माजी आमदार तथा शिक्षणसम्राट सेवकभाऊ पाटील वाघाये, सरोजताई सेवकभाऊ वाघाये व विलास पाटील वाघाये आदींचा ऋणी आहे.माझ्या वाढदिवसानिमित्त केलेला सत्कार हा सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्याची जनतेने घेतलेली दखल आहे.तसेच यापुढेही माझ्या हातून वर्तमान परिस्थितीत व भविष्यातही असेच समाजकार्य, शिक्षणकार्य व सर्वधर्मसमभाव ऐक्याचे कार्य घडविण्यासाठी प्रयत्नरत असणार आहे.त्याचप्रमाने माझा स्वरचित कविता संग्रह लवकरच प्रकाशित करणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नलेश रहाटे यांनी केले.तर प्रास्ताविक प्रा.वाढई यांनी केले.

यशस्वीतेसाठी जगतगुरु संत तुकाराम महाराज सेवा मंडळ आरमोरी,निर्धनराव पाटील वाघाये शिक्षण महाविद्यालय आरमोरी, सम्राट सेवकभाऊ वाघाये पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आरमोरी आदींचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सेवा मंडळाचे सेवाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.