आज आरमोरीत काॅंग्रेसचा तहसिल कार्यालयावर धडक मोर्चा

297

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

आरमोरी ( जिल्हा गडचिरोली): तालुका काँग्रेस कमिटीतर्फे जनसामान्यांच्या विविध मागण्यांसाठी कमिटीचे अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे व जिल्हा उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालय आरमोरीवर आज दिनांक ७ नोव्हेंबर २०२३ रोजी
मोर्चा धडकणार आहे.

सदर मोर्चा बहुसंख्य सहभागी नागरिकांचे उपस्थित राममंदिर पासून ठीक १२वाजता निघणार आहे.

मोर्चात समस्याग्रस्त नागरिकांनी बहुसंख्येने आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.