विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली): तालुक्यातील वैरागड येथील शिवाजी महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे आज दिनांक १९आॅक्टोंबर २०२३रोजी सांयकाळी ४.३०वाजता प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन होणार आहे.
आॅनलाईन कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा तसेच निमंत्रक म्हणून गडचिरोली जिल्हाधिकारी संजय मीना, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार , उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त योगेंद्र शेंडे आदी उपस्थित राहणार आहेत.
नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
_________________________
# राज्यातील ३५० तालुक्यातील ५११ ग्रामपंचायतीमध्ये कौशल्य विकास केंद्र
#ग्रामीण युवा होणार रोजगार व उद्योजकता सज्ज
#कृषिपुरक पारंपरिक व व्यावसायिक कौशल्य क्षेत्रातील प्रशिक्षण
#पी.एम.विश्वकर्मा योजनेसाठी उपयुक्त संरचना
________________________