नागपूर-कोरची आणि नागपूर-कुरखेडा बस सेवा 6 मार्चपासून प्रवाशाच्या सेवेत

70

आमदार मसराम यांच्या पाठपुराव्याला यश

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी( जिल्हा गडचिरोली ): गडचिरोली जिल्ह्यातील प्रवाशांची अनेक दिवसांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आमदार रामदास मसराम यांच्या निरंतर पाठपुराव्याला मोठे यश आले असून,उद्या ६ मार्च २०२६ पासून नागपूर-कोरची आणि नागपूर-कुरखेडा या दोन नवीन बस सेवा नियमितपणे सुरू होत आहेत.

या नवीन बस गाड्यांमुळे विद्यार्थ्यांपासून ते नोकरदारांपर्यंत सर्वच प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः आरमोरी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांसाठी नागपूरचा प्रवास आता अधिक सोयीस्कर झाला आहे.

आमदार रामदास मसराम यांचे जनतेतून अभिनंदन केले जात आहे.