विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली/नागपूर,दि.१९:विदर्भ राज्य आंदोलन समिती च्या वतीने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मिती करीता रविवार, दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी, दुपारी 12 वाजता विदर्भ चंडिका मंदिर शहीद चौक, इतवारी, नागपूर येथून विदर्भ जनसंकल्प लॉंग मार्च काढण्यात येणार आहे. हा लॉंग मार्च चिटणीस पार्क पर्यंत जाऊन तेथे भव्य मेळावा घेण्यात येणार आहे.
तरी विदर्भातील सर्व जनतेनी यात सहभागी होऊन विदर्भ निर्माण जनसंकल्प लॉंग मार्च व मेळावा यशस्वी करावा असे आवाहन विराआसचे पदाधिकारी ऍड. वामनराव चटप(माजी आमदार तथा अध्यक्ष विराआस,प्रकाशभाऊ पोहरे(मुख्यसंपादक ,दैनिक देशोन्नती),श्रीमती रंजनाताई मामर्डे(अध्यक्षा, महिला आघाडी),डॉ. श्रीनिवास खान्देवाले(जेष्ठ अर्थतज्ञ व तज्ञ को.क. सदस्य ),मुकेश मासुरकर(अध्यक्ष, युवा आघाडी ),अरुणभाऊ केदार
(अध्यक्ष, पूर्व विदर्भ विभाग ),
प्रा. डॉ. पी. आर. राजपूत
(अध्यक्ष ,पश्चिम विदर्भ ),सुनिलभाऊ चोखारे(उपाध्यक्ष, पूर्व विदर्भ ),ऍड. सुरेशराव वानखेडे(उपाध्यक्ष, पश्चिम विदर्भ),तात्यासाहेब मत्ते(विदर्भ प्रचार प्रमुख ) आदींनी केले आहे.









