विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली : बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना पायाभूत सोयी-सुविधा पुरवण्यासाठी १० लाख रुपयांपर्यंत अनुदान योजना सन २०२५-२०२६” ही योजना अल्पसंख्याक विकास विभागाच्या शासन निर्णय, क्र. अविवि २०२४/प्र.क्र.७५/का.६, दिनांक ०७/१०/२०२४ व शासन परिपत्रक, क्र. अविवि २०२६/प्र.क्र.०३/ का.६. दिनांक २७/०१/२०२६ अन्वये राबविण्यात येत आहे.
सदर योजनेअंतर्गत सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षाकरीता अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या संस्थासाठी योजनेच्या अटी व पात्रता पुढीलप्रमाणे आहे.
संस्था धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असावी. संस्थेच्या कार्यकारिणीमध्ये ५१ टक्क्यांहून अधिक सदस्य/विश्वस्त हे बौद्ध समाजातील असणे अनिवार्य आहे. ही योजना शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थांसाठी आहे.
सदर योजनेअंतर्गत पात्र संस्थांनी आपले प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती कार्यालय, नियोजन भवन, गडचिरोली येथे दिनांक २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावा. विहित मुदतीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत.
प्राप्त प्रस्तावांची छाननी करुन त्रुटीची पुर्तता करवून अंतिमरीत्या सदर योजने अंतर्गत अनुदानास पात्र होणाऱ्या संस्थांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनास सादर करण्यात येईल. दिनांक २० फेब्रुवारी २०२६ नंतर प्राप्त होणारे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी. असे जिल्हा नियोजन अधिकारी, तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी, गडचिरोली, प्रसाद. घ. घाडगे यांनी कळविले आहे.
0000








