इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विविध पुरस्काराकरीता अर्ज करावेत

47

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली,दि.१९: शासन निर्णयान्वये विभागांतर्गत स्थापित महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार, नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार व क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार. सदर पुरस्काराकरीता वीरशैव -लिंगायत समाजासाठी सामाजिक, कलात्मक, समाज संघटनात्मक आध्यात्मिक प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्तीच्या व संस्थांच्या कामाची दखल घ्यावी व इतरांना त्यापासून प्रेरणा मिळावी, जेणेकरुन या समाजातील समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिक सरसावून पुढे यावेत याकरीता व्यक्तीसाठी व संस्थेसाठी पुरस्कार देण्यात येणार आहे.

त्याअनुषंगाने सदर पुरस्कार सन २०२५-२६ साठी देण्याकरीता गडचिरोली जिल्ह्यातील इच्छुक व्यक्ती व संस्था यांनी रितसर अर्ज उपरोक्त पुरस्कारासाठी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक, इतर मागास बहुजन कल्याण गडचिरोली या कार्यालयात कार्यालयीन वेळेस दिनांक २७.०२.२०२६ रोजी पूर्वी अर्ज सादर करण्यात यावेत. अर्जाचा नमुना प्रत कार्यालयातून प्राप्त करुन घ्यावे व अधिक माहितीसाठी या कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा असे आवाहन डॉ. सचिन मडावी, सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण गडचिरोली यांनी केले आहे.

0000