हजारो कंत्राटी कामगारांनी सहभागी होण्याचे काॅ. अमोल मारकवार यांचे आवाहन
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली : येत्या 12 फेब्रुवारी रोजी केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी, शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात देशव्यापी सार्वत्रिक संपाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनात 30 कोटींहुन व अधिक कामगार, शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील ५ हजारांहून अधिक कामगार, शेतकऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 12 वाजता आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनात जिल्ह्यातील कंत्राटी कामगार आणि शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ.अमोल मारकवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केले आहे.
⬜⬜⬜⬜⬜⬜⬜
📄 विविध मागण्यांचा समावेश
कामगारांवर अन्याय करणाऱ्या चार श्रमसंहिता रद्द करा, असंघटित कामगारांना 26 हजार रुपये वेतन देण्यात यावे, 60 वर्षे वरील सर्व कामगार, शेतकरी, शेतमजूरांना 5000/- रुपये मासिक पेन्शन देण्यात यांवे इत्यादी मागण्या करण्यात येणार आहेत.
🟧🟧🟧🟧🟧🟧🟧
या आंदोलनात अंगणवाडी सेविका,आशा वर्कर, शालेय पोषण आहार कर्मचारी, अंशकालीन परीचर कामगार व शेतकरी, शेतमजूर यांच्या सर्व संघटना आंदोलनात सहभागी होणार आहेत.
◽◽◽◽◽◽◽◽
या आंदोलनाचे नेतृत्व सिटु संघटनेचे कॉ. रमेशचंद्र दहिवडे, कॉ.जामदार , कॉ.अमोल मारकवार,
डॉ. धर्मराज सोरदे,राज बन्सोड आदी करणार आहेत.
◽◽◽◽◽◽◽









