विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली): येथील इंदिरा नगर परिसरातील रहिवासी शामराव कुथे (६५ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी निधन झाले.
ते आरमोरी,वडसा, गडचिरोली येथील विमा अभिकर्ता व लेखापाल ची कामे करीत होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली,सुन, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर उद्या दिनांक २८ जानेवारीला ठीक १२ वाजता वैनगंगा नदीच्या तीरावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
💐🙏💐 दिवंगत शामरावजी कुथे साहेब यांच्या जीवात्मास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏 श्री अजयजी कुथे यांच्या परिवारावर कोसळलेल्या दुःखद प्रसंगी आम्ही त्यांच्या दु:खात सहभागी आहोत. कुथे कुटुंबियांना परमेश्वर या दुःखातून सावरण्याचे बळ देवो. ॐ शांती..शांती🙏✍️🎤 संपादक, विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क









