डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन सभा

80

श्री किसनराव खोब्रागडे कनिष्ठ महाविद्यालयाचा पुढाकार

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली): तालुक्यातील वैरागड येथील श्री. किसनराव खोब्रागडे ज्युनिअर कॉलेज तर्फे ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य अभिवादन सभा प्राचार्य विवेक हलमारे यांच्या मार्गदर्शनात पार पडली.

यावेळी अभिवादन सभेत अनेक विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर भाषण, गीत सादर केलीत.

संघर्षाचे दुसरे नाव म्हणजे बाबासाहेब! शिक्षण स्वतः साठी नाहीतर समाजोद्धारासाठी घेतले पाहिजे असे प्रतिपादन अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना प्रा. मनीष राऊत यांनी केले.

प्रमुख अतिथी म्हणून प्रा. नरेश लाडे, प्रा. अमोल नैताम, प्रा. चंद्रशेखर बर्वे, प्रा. कु. दीपाली चांदेवार , प्रा. सरकार होते.

संचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. प्रकाश म्हशाखेत्री यांनी केले. तर प्रास्ताविक प्रा. अमोल नैताम व आभार प्रदर्शन प्रा. बर्वे यांनी केले.

तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निखिल पाटील यांनी अथक प्रयत्न केले.