आरमोरी येथे श्रमदान करून साजरा केला होमगार्ड वर्धापन दिन

223

बहुसंख्येने उपपथकातील होमगार्ड उपस्थित

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली):महाराष्ट्र राज्य नागरी संरक्षण दल तथा होमगार्ड संघटनेचा 79 वर्धापन दिनाचे औचित्य साधून आरमोरी उपपथक कार्यालयाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर अभियान जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक श्री कार्तिक मधीरा यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरी होमगार्ड उपपथक कार्यालयाचे प्रभारी अधिकारी श्री सुरेश सोनटक्के यांच्या उपस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

यात आरमोरी होमगार्ड उपपथकातील बहुसंख्य होमगार्डनी स्वच्छता अभियानात सहभाग दर्शविला.

कृषी उत्पन्न बाजार समिती आरमोरीच्या प्रांगणात दर शुक्रवारला आठवडी बाजार भरत असते. या बाजारातील परिसरात पडलेला केरकचरा तसेच बाजार समितीच्या गोदाम नजिकच्या परिसरात वाढलेली झाडे ही गृहरक्षक दलाच्या जवानांनी काढून स्वछता केली.तसेच या अभियानाच्या दरम्यान संपूर्ण बाजार समितीच्या पटांगणाची स्वच्छता करण्यात आली.

हा वर्धापन दिन विविध उपक्रमाद्वारे दिनांक ६ डिसेंबर ते 13 डिसेंबर यादरम्यान साजरा करण्यात येत असून यामध्ये अनेक गृहरक्षक दलाचे जवान सहभागी होत आहेत हे विशेष!

हा स्वच्छता अभियान राबवताना जिल्हा होमगार्ड पथक कार्यालयाचे प्रशासकीय अधिकारी श्री निकम , प्रभारी केंद्र नाईक रवींद्र सहारे ,तसेच मिर्झा यांच्या मार्गदर्शनात आरमोरी उपपथक कार्यालयाचे होमगार्ड सैनिकांनी स्वच्छता अभियानाकरीता अथक परिश्रम घेतले.