विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी,जिल्हा गडचिरोली: तालुक्यातील नवीन वघाळा (सिताबर्डी ) परिसरातील रहिवासी श्री माधव विठोबा मेश्राम (७८वर्षे) यांचे आज दिनांक १७ आॅक्टोंबर २०२५ रोजी सकाळचे सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले.
ते सामाजिक कार्यकर्ते लिलाधर मेश्राम यांचे वडील होत.
त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर उद्या दिनांक १८ आॅक्टोंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता आरमोरी परिसरातील रामाळा जवळील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
__________________________
💐🙏💐शोकसंवेदना (भावपूर्ण श्रद्धांजली)
. आरमोरी शहरात लाॅंड्री व्यवसाय करुन प्रपंच करणारे, मितभाषी आमचे काकाजी माधवराव मेश्राम जी यांचे वयोमानानुसार आज १७ आॅक्टोंबरला निधन झाले.ही काळजाला चटका लावणारी अंत्यत दुःखद घटना घडली.आयुष्यभर काकाजींनी श्रमाला फार महत्त्व दिले होते.त्याचबरोबर सुजाण नागरिकांशी सदोदीत संपर्क ठेवला होता.अशा श्रमजीवी आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली!
तसेच त्यांच्या कुटुंबीयांना कोसळलेल्या दुःखातून सावरण्याचे बळ ईश्वर देवो हीच विधायक प्रार्थना.🙏
ओम् शांती शांती.
आपले शोकाकुल
✍️🎙️ विलास गोंदोळे संपादक, विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क