नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक उबाठा शिवसेना स्वबळावर लढणार..

37

नेते व कार्यकर्ते यांच्या विचारविनिमय बैठकीत घेतला निर्णय

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी, जिल्हा गडचिरोली:
नुकतेच नगरपरिषद आरक्षण जाहीर झाले असून सदर निवडणूक उबाठा शिवसेना हे आरमोरी नगरपरिषद स्वबळावर लढण्याचे विश्रामगृह आरमोरी येथे घेण्यात आलेल्या बैठकीत एकमताने ठरविण्यात आले. एकूण दहा प्रभागावरही स्वतंत्र उमेदवार देण्याचे घोषित करण्यात आले.

याप्रसंगी उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके ,सह संपर्कप्रमुख विजयभाऊ शृंगारपवार, उपजिल्हाप्रमुख सुनील पोरड्डीवार, बुधाजी किरमे ,लक्ष्मीताई मने, वेणूताई ढवगाये ,हेमलता वाघाडे ,राजू अंबानी ,भूषण सातव, ज्ञानेश्वर ढवगाये, सागर मने, तानाजी कुथे, लहानू पिलारे ,रामा पिल्लारे, विजय मुर्वतकार, देविदास काळबांडे, सुनील, सारिका मार्बते, सुरेखा गोंदोळे, राजूभाऊ ढोरे ,राजू उपासे,आशिष दहीकार ,उद्धव बनकर ,गणेश तिजारे ,विलास दाने आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.