जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण सोडत १० ऑक्टोबरला

48

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली,दि. ९ ऑक्टोबर : गडचिरोली जिल्ह्यातील 12 पंचायत समित्यांच्या सभापती पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी दिनांक 10 ऑक्टोबर, 2025 रोजी दुपारी 12.30 वाजता सोडत काढण्यात येणार आहे. ही सोडत जिल्हाधिकारी कार्यालय येथील जिल्हा नियोजन समितीचे सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या 17 सप्टेंबर, 2025 च्या पत्रानुसार, गडचिरोली जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती पदांच्या आरक्षणाची माहिती खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे.

अनुसूचित क्षेत्रात न मोडणाऱ्या 5 पंचायत समित्या

गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी आणि मुलचेरा या 5 (पाच) पंचायत समित्या संपूर्णतःअनुसूचित क्षेत्रात मोडणाऱ्या नाहीत.

या 5 सभापती पदांसाठी खालीलप्रमाणे आरक्षण असेलः

अनुसूचित जाती (महिला): 1 पद

अनुसूचित जमाती (महिला): 1 पद

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग: 2 पदे

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला): 1 पद

संपूर्णतः अनुसूचित क्षेत्रामधील 7 पंचायत समित्या :

कोरची, कुरखेडा, धानोरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी आणि सिरोंचा या 7 पंचायत समित्या संपूर्णतः अनुसूचित क्षेत्रामधील असल्यामुळे, या सभापती पदांसाठी खालीलप्रमाणे आरक्षण असेलः

अनुसूचित जमातीः 3 पदे

अनुसूचित जमाती (महिला): 4 पदे

या सोडतीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि सर्वसाधारण यांसाठी, तसेच यांतर्गत महिलांकरिता आरक्षण निश्चित करण्यात येईल.

ज्या नागरिकांना या सभेला उपस्थित राहण्याची इच्छा आहे, त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथील जिल्हा नियोजन समितीचे सभागृहात उपरोक्त ठिकाणी व वेळी उपस्थित राहावे, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य) स्मिता बेलपत्रे यांनी कळविले केले आहे.

0000