आरमोरीत २४ सप्टेंबरला दिव्यांग मेळाव्यात उपस्थित राहणार प्रहारचे बच्चूभाऊ कडू

144

जनतेच्या हक्कासाठी शेतकरी संघर्षयात्रा

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी/गडचिरोली: शेतकरी कर्जमाफी, निराधार, दिव्यांग, मजूर, मछीमार, मेंढपाळ तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी खंबीरपणे आवाज उठवणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व आमदार बच्चूभाऊ कडू माजी मंत्री यांचा झंझावाती दौरा दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी गडचिरोली जिल्ह्यात होत आहे.

जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यात आरमोरी येथील बर्डी परिसरात वडसा टी पॉइंट जवळील मंगल कार्यालयात दि.२४ सप्टेंबरला दुपारी २ वाजता दिव्यांग मेळावा होणार आहे.सदर कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री तथा प्रहारचे नेते बच्चूभाऊ कडू उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

———————————
📄 खालीलप्रमाणे दौरा

१ ) पारडी गडचिरोली सकाळी ११ . ३० वाजता शेतकरी व कार्यकर्ता बैठक

२ )पत्रकार परिषद सर्किट हाऊस सकाळी ११वाजता

३) डोंगरगाव बस स्टॅंड सत्कार आरमोरी व शेतकरी सभा दुपारी १ वाजता

४) आरमोरी दिव्यांग मेळावा व कार्यकर्ते मेळावा साई दामोधर मंगल कार्यालय आरमोरी.दुपारी २ . ३० वाजता

५ )गाव. कुरुड , तालुका- वडसा शेतकरी हक्क परिषद मारोती मंदिर झुरे मोहल्ला कुरुड, सायंकाळी ५ वाजता

६) सायंकाळी ७ वाजता आरमोरी इंदिरा गांधी चौक ते टिळक चौक माता राणी दर्शन
—————————————-
सदर कार्यक्रमास सर्व शेतकरी,दिव्यांग , शेतमजुर , कामगार बांधव यांनी उपस्थित राहावे असे आवाहन
प्रहार जनशक्ती पार्टीचे जिल्हा प्रमुख निखिल धार्मिक तसेच दिव्यांग सेलचे अरविंद धकाते,अनंत भोयर यांनी केले आहे.