विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली): तालुक्यातील नवीन वघाळा येथील रहिवासी तथा वघाळा ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच पटवारी किसन दोनाडकर (६८वर्षे) यांचे दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक २सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता वैनगंगा नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या निधनामुळे संपूर्ण वघाळा, बर्डी परिसरात शोककळा पसरली आहे.
————————–+————-
💐🙏💐 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आदरणीय पटवारी दोनाडकर साहेब यांच्या निधनाचे वृत्त मनाला चटका लावणारे आहे.त्यांनी संपूर्ण हयातभर वघाळा (जुना -नवीन)येथे समाजकारण, राजकारण व आता राष्ट्रसंतांच्या सर्वधर्मसमभाव या आध्यात्मिक विचारधारेवर वाटचाल सुरू केली होती.त्यांच्या जाण्याने कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ ईश्वर देवो हीच विधायक प्रार्थना 🙏
शोकाकुल
🎙️✍️ विलास गोंदोळे संपादक, विधायक दीपस्तंभ न्यूज
💐🙏💐