ग्रंथालय विषयक विविध पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

95

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली,दि.३० आॅगस्ट : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय
संचालनालयामार्फत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास साधण्यासाठी तसेच वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी दरवर्षी प्रतिष्ठेचे पुरस्कार दिले जातात. यामध्ये “डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार” तसेच ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते आणि सेवकांसाठी “डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार” यांचा समावेश आहे.

 

📚🏆सार्वजनिक ग्रंथालयांसाठी पुरस्कार

राज्यातील शहरी आणि ग्रामीण विभागातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना त्यांच्या वर्गानुसार रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येते.

“अ” वर्ग ग्रंथालय- रु. १,००,०००/-

“ब” वर्ग ग्रंथालय रु. ७५,०००/-

“क” वर्ग ग्रंथालय रु. ५०,०००/-

“ड” वर्ग ग्रंथालय रु. २५,०००/-

कार्यकर्ता व सेवकांसाठी पुरस्कार

भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने राज्यस्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रंथालय कार्यकर्त्यांना आणि सेवकांना विशेष सन्मान दिला जातो. एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय सेवक प्रत्येकी रु. ५०,०००/-प्रत्येक महसुली विभागातील एक उत्कृष्ट कार्यकर्ता व सेवक प्रत्येकी रु. २५,०००/-

📄अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख

सन २०२४-२५ या वर्षाच्या पुरस्काराकरिता इच्छुक ग्रंथालये, कार्यकर्ते आणि सेवक (ग्रंथमित्र) यांनी आपला विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह तीन प्रतीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे सादर करावा. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२५ अशी आहे, असे जिल्हा ग्रंथालय अधिकारी एस.एस. गजभारे यांनी कळविले आहे.

0000