भाऊराव घरजारे यांचे निधन
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली): येथील इंदिरानगर परिसरातील शेतकरी भाऊराव बाजीराव घरजारे (६५वर्षे) यांचे आज दिनांक २८ आॅगस्टला सकाळी ७ वाजताचे सुमारास निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, जावई व नातवंडे तसेच भाऊ असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक २८ आॅगस्ट २०२५ रोजी दुपारी ठीक १ वाजता गाढवी नदीचे तिरावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
———————————–++
💐🙏💐 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आदरणीय भाऊराव घरजारे (मामाश्री) यांना विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 आम्ही आपल्या दु:खात सहभागी आहोत.या दुःखातून सावरण्याचे बळ ईश्वर ‘घरजारे’ कुटुंबीयांना देवो हीच प्रार्थना 🙏
🎙️✍️ विलास गोंदोळे संपादक, विधायक दीपस्तंभ न्यूज
_________________________









