विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली:कृष्णाष्टमीपासूनच सुरू झालेल्या पावसाच्या जलधारा धुवांधारपणे महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांत बरसत आहेत.अशाच कोसळधारांनी गडचिरोली जिल्ह्यातील जनजीवनालाही जेरीस आणले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
संततधार पावसामुळे व विविध धरणातील विसर्गामुळे गडचिरोली जिल्ह्यातील पाणी पातळीत वाढ होत आहे.यासंदर्भात नागरीकांच्या जागृतीकरीता विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क ने संकलित केलेली माहिती खालीलप्रमाणे
“धरण विसर्ग सद्य:स्थिती
*दिनांक*: 20/08/2025, सकाळी 9.30 वा.
———–
*गोसीखुर्द प्रकल्प* – (43.03%)
गेट सुरु- 33 पैकी 29 गेट उघडलेले
विसर्ग- 3,327 क्युमेक्स (1,17,486 क्युसेक्स)
—
*चिचडोह बॅरेज* – (Free Flow)
गेट सुरु- 38 पैकी 38 गेट उघडलेले
विसर्ग- 11,073 क्युमेक्स (3,91,043 क्युसेक्स)
—
निम्न वर्धा प्रकल्प – (69.33%)
गेट सुरु- 31 पैकी 19 गेट उघडलेले
विसर्ग- 505 क्युमेक्स (17,856 क्युसेक्स)
—
श्रीराम सागर प्रकल्प – (82.95%)
गेट सुरु- 42 पैकी 26 गेट उघडलेले
विसर्ग- 2,912 क्युमेक्स (1,02,850 क्युसेक्स)
—
श्रीपदा येलमपल्ली प्रकल्प – (76.43%)
गेट सुरु- 62 पैकी 40 गेट उघडलेले
विसर्ग- 15,390 क्युमेक्स (5,43,482 क्युसेक्स)
—
मेडीगड्डा बॅरेज – (Free Flow)
गेट सुरु- 85 पैकी 85 गेट
विसर्ग- 26,530 क्युमेक्स (9,36,890 क्युसेक्स)
—
प्रमुख नद्यांची पाणी पातळी
जिल्हा- गडचिरोली
🗓️ दि.: 20/08/2025 सकाळी 9.30 वा.
———–
*वडसा साखरा (वैनगंगा नदी)* –
धोका पातळी- 216.20 मी.
इशारा पातळी- 215.20 मी.
सध्याची पातळी- 211.65 मी.
*इशारा पातळीच्या खाली वाहत आहे*
—–
*आष्टी (वैनगंगा नदी)* –
धोका पातळी- 150.92 मी.
इशारा पातळी- 149.42 मी.
सध्याची पातळी- 150.15 मी.
🟡 *इशारा पातळीच्या वर वाहत आहे*
—–
*अहेरी गुडम (प्राणहिता नदी)* –
धोका पातळी- 121.00 मी.
इशारा पातळी- 120.00 मी.
सध्याची पातळी- 120.05 मी.
🟡 *इशारा पातळीच्या वर वाहत आहे*
—–
*कालेश्वरम (गोदावरी नदी)* –
धोका पातळी- 104.75 मी.
इशारा पातळी- 103.50 मी.
सध्याची पातळी- 103.70 मी.
🟡 *इशारा पातळीच्या वर वाहत आहे*
—–
*पाथागुडम (इंद्रावती नदी)* –
धोका पातळी- 99.75 मी.
इशारा पातळी- 97.75 मी.
सध्याची पातळी- 97.55 मी.
*इशारा पातळीच्या खाली वाहत आहे*
—–
पुरामुळे बंद असलेले मार्ग दि.20.08.2025
वेळ सकाळी 8.00 वा.
1) हेमलकसा भामरागड राष्ट्रीय महामार्ग-130 डी (पर्लकोटा नदी) तालुका भामरागड
2) सिरोंचा असरअली जगदलपूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग-63 (सोमनपल्ली नाला) तालुका सिरोंचा
3) अहेरी वटरा रस्ता राज्यमार्ग 370 (वटरा नाला)ता. अहेरी
4) चौडमपल्ली चपराळा रस्ता प्रजिमा-53 स्थानिक नाला) तालुका चामोर्शी
5) शंकरपूर ते विठ्ठलगाव रस्ता प्रजिमा-1 तालुका देसाईगंज
6) कोकडी ते तुलशी रस्ता प्रजिमा -49 तालूका देसाईगंज
7) कोंढाळा कुरुड वडसा रस्ता प्रजिमा-47 तालुका देसाईगंज
8) भेंडाळा बोरी गणपूर रस्ता प्रजिमा-17 (हळदीमाल नाला
9) हलवेर ते कोठी रस्ता इजीमा-24 तालुका भामरागड
10) मनेराजाराम ते दामरंचा रस्ता (बांडिया नदी) तालुका भामरागड
11) कोपेला झिंगानूर रस्ता तालुका सिरोंचा
अशी माहिती प्राप्त झाली आहे.
————————————–









