हवामान अंदाज व प्रमुख नद्यांची पाणी पातळी

150

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली: विदर्भातील विविध जिल्ह्यातील दिनांक २९ जुलै २०२५ ते २ आॅगस्ट २०२५ या कालावधीतील चेतावणी संबंधित नकाशा सदृश्य चित्रात दाखविले आहे.तसेच खालीलप्रमाणे
प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीची सद्यस्थिती
दिनांक: 29 जुलै 2025, सायंकाळी 6:00 वा.
—————————-
👉 वैनगंगा नदी:
गोसीखुर्द प्रकल्प- सध्या 33 पैकी 15 गेट उघडलेले असून एकूण 1794 क्युमेक्स विसर्ग सुरु आहे.
वडसा, आष्टी आणि चिचडोह बॅरेज केंद्रांवरील नोंदीनुसार, वैनगंगा नदीची पाणी पातळी *इशारा पातळीच्या खाली* आहे.

👉 वर्धा नदी:
ब्राह्मणी बल्लारशा, सकमूर व सिरपूर केंद्रांवरील नोंदीनुसार, वर्धा नदी *इशारा पातळीच्या खाली* वाहत आहे.

👉 प्राणहिता नदी:
अहेरी गुडम केंद्रावरील नोंदीनुसार, प्राणहिता नदी *इशारा पातळीच्या खाली* वाहत आहे.

👉 गोदावरी नदी:
कालेश्वरम आणि मेडीगड्डा बॅरेज केंद्रांवरील नोंदीनुसार, गोदावरी नदी *इशारा पातळीच्या खाली* वाहत आहे.

👉 इंद्रावती नदी:
जगदलपूर, चिंदनार आणि पाथागुडम येथील नोंदीनुसार, इंद्रावती नदी *इशारा पातळीच्या खाली* वाहत आहे.
अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गडचिरोली तर्फे प्राप्त झाली आहे.

फोटो साभार: प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर