३० जुलैला राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.उईके गडचिरोली दौ-यावर

209

रानभाजी महोत्सव, वसतीगृहाचे लोकार्पण, लाभार्थी मेळावा व विभागीय आढावा

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली,दि.२९ जुलै:राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके हे दिनांक 30 जुलै 2025 रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते विविध शासकीय कार्यक्रमांना उपस्थित राहून आदिवासी विकास योजनांची अंमलबजावणी, स्थानिक विकासकामांचा आढावा आणि लाभार्थ्यांना योजना वितरण कार्यक्रमात सहभागी होणार असून नागपूर विभागातील आदिवासी विभागाचा आढावा घेणार आहेत.

📄त्यांच्या दौ-याची रुपरेषा

सकाळी ९.३० वा. शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे आगमन. १०.३० वा. शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, सेमाना येथे वृक्षारोपण. ११.०० वा. सुमानंद सभागृह, आरमोरी रोड येथे आयोजित रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन व विविध आश्रमशाळा व वसतीगृहांच्या इमारतींचे आभासी लोकार्पण. यासोबतच पी.एम. जनमन व धरती आबा योजनांचे लाभार्थी मेळावा व विविध आदिवासी योजनांअंतर्गत लाभ वितरण कार्यक्रम. दुपारी १.३० ते २.३० राखीव, दुपारी २.३० ते ४.३० वा. जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे नागपूर विभागीय आढावा बैठकीत आदिवासी विभागाच्या जनजाती न्याय महाअभियान, धरती आबा ग्राम उत्कर्ष योजना, वनहक्क दावे व अतिक्रमण संबंधित प्रश्न व आदिवासी महामंडळ योजनांची अंमलबजावणी या प्रमुख योजनांचा आढावा घेण्यात येणार आहे. यानंतर सायंकाळी सोयीनुसार गडचिरोलीहून यवतमाळकडे प्रयाण करतील.

0000