विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली): मुळचे आरमोरी येथील रहिवासी व युवारंग या संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते कुमार दामोदर बारसागडे यांचे दिनांक १३ जुलैला दुपारी ३ वाजता नागपूर येथे रुग्णालयात निधन झाले.
ते आरमोरी येथील युवारंग संघटनेच्या स्थापनेपासूनच विविध कार्यात हिरहिरीने सहभागी होत असत.ते सतत युवारंगला प्रोत्साहन देत असत.
त्यांच्या पश्चात आई व बराच मोठा आप्त परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक १४ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता उमरेड नजीकच्या मकरधोकडा येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
त्यांच्यासारख्या युवा कार्यकर्त्यांच्या अकाली निधनाने आरमोरी परिसरात शोककळा पसरली आहे.
———————————-
💐🙏💐 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 आम्ही आपल्या दु:खात सहभागी आहोत.
🎙️✍️ संपादक व सर्व टीम
विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क









