विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली): गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे व गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडले गेले त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला.त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नदीच्या पात्रात पाणी पातळीत वाढ झाली.जिह्यातील पाल नदी व गाढवी नदी तुडुंब भरून वाहत असल्यामुळे गडचिरोली ते आरमोरी हा मुख्य दळणवळणाच्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक दिनांक ८ जुलैला सायंकाळी सहा वाजता पासून बंद झालेली आहे.तसेच जिल्ह्यातील तालुक्याचे विविध महत्त्वाचे जवळपास १८ मार्गही ठप्प झाली आहेत.
🚘पुरामुळे बंद असलेले मार्ग
1) गडचिरोली ते आरमोरी रस्ता राष्ट्रीय महामार्ग 353 सी (पाल नदी, गाढवी नदी)
2) देसाईगंज सडकअर्जुनी रस्ता प्रमुख राज्यमार्ग -11 तालुका देसाईगंज
3) कुरखेडा मालेवाडा रस्ता राज्यमार्ग 362 ता.कुरखेडा (खोब्रागडी नदी)
4) कोरची बोटेकसा भीमपूर रस्ता राज्यमार्ग 314 तालुका कोरची (भीमपूर नाला)
5) कुरखेडा वैरागड रस्ता राज्यमार्ग 377 तालुका कुरखेडा
6) वैरागड कोरेगाव धानोरा रस्ता राज्यमार्ग 368 तालुका आरमोरी
7) मांगदा ते कलकुली प्रजिमा 50
8)कढोली ते उराडी रस्ता प्रजिमा 7 ता.कुरखेडा (लोकल नाला )
9) चातगाव रांगी पिसेवाडा रस्ता प्रजिमा 36 तालुका आरमोरी
10) गोठनगडी चांदागड सोनसरी रस्ता प्रजिमा 38 तालुका कुरखेडा
11) कुरखेडा तळेगाव चारभट्टी रस्ता प्रजिमा 46 तालुका कुरखेडा
12) आंधळी नैनपुर रस्ता प्रजिमा 32(सती नदी)
13) शंकरपूर जोगीसाखरा कोरेगाव चोप रस्ता प्रजिमा 1 तालुका देसाईगंज
14) आष्टी उसेगाव कोकडी तुलसी कोरेगाव रस्ता प्रजिमा 49 तालुका देसाईगंज
15) मालेवाडा खोब्रामेंढा रस्ता प्रजिमा 4 तालुका कुरखेडा
16) वैरागड देलनवाडी रस्ता प्रजिमा 8 तालुका आरमोरी
17) चौडमपल्ली चपराळा रस्ता प्रजिमा 53 तालुका चामोर्शी
18) सावरगाव कोटगुल रस्ता प्रजिमा 3 तालुका कोरची
19) अरसोडा कोंढाळा कुरूड वडसा रस्ता प्रजिमा 47 तालुका देसाईगंज
सदर मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.पूर ओसरल्यानंतर संबंधित रस्ते सुरु होतील अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग, गडचिरोली प्रशासनाने दिली आहे.
—————————————-
गडचिरोली तालुक्यातील बंद असलेले मार्ग
1. मौशीखांब ते अमिर्झा मार्ग
2. चांदाळा ते कुंभी मार्ग
3. रानमुल ते माडेमुल मार्ग
4. गडचिरोली ते साखरा पाल नदी आरमोरी मार्ग
5. साखरा ते चुरचुरा मार्ग
6. नवरगांव ते चुरचुरा मार्ग
हे मार्गही सद्यःस्थितीत बंद आहेत.
——————————————
“धरण विसर्ग सद्य:स्थिती
*दिनांक*: 08/07/2025, सायं. 6.00 वा.
———–
*गोसीखुर्द प्रकल्प* – (22.52%)
▪️गेट सुरु- 33 पैकी 33 गेट
▪️विसर्ग- 12,945 क्युमेक्स (4,57,149 क्युसेक्स)
*चिचडोह बॅरेज* – (Free Flow)
▪️गेट सुरु- 38 पैकी 38 गेट
▪️विसर्ग- 10,355 क्युमेक्स (3,65,700 क्युसेक्स)
*निम्न वर्धा प्रकल्प* – (52.55%)
▪️गेट सुरु- 0 गेट
▪️विसर्ग- 0 क्युमेक्स
*श्रीराम सागर प्रकल्प* – (23.88%)
▪️गेट सुरु- 0 गेट
▪️विसर्ग- 0 क्युमेक्स
*श्रीपदा येलमपल्ली प्रकल्प* – (43.27%)
▪️गेट सुरु- 0 गेट
▪️विसर्ग- 0 क्युमेक्स
*मेडीगड्डा बॅरेज* – (Free Flow)
▪️गेट सुरु- 85 पैकी 85 गेट
▪️विसर्ग- 3,790 क्युमेक्स (1,33,830 क्युसेक्स)
_(सौजन्य:- गडचिरोली पाटबंधारे विभाग)_
——
*जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली*”
———————————
🛟 नदी, धरण पातळी सद्यस्थिती
🗓️ दिनांक*: 08-07-2025
⏱️वेळ: 07:40 PM
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
🔸 *पुजारीटोला* – (76.74%)
▪️गेट सुरु- 08 गेट
▪️विसर्ग- 335.00 क्युमेक
🔸 *बावनथडी* – (15.91%)
▪️गेट सुरु- 0 गेट
▪️विसर्ग- 0.0 क्युमेक
🔸 *संजय सरोवर* – (66.71%)
▪️गेट सुरु- 02 गेट
▪️विसर्ग- 260.00 क्युमेक
🔸 *गोसेखुर्द* – (21.36%)
▪️गेट सुरु- 33 गेट
▪️विसर्ग- 12907.86 क्युमेक
🔸 *धापेवाडा* – (0.0%)
▪️गेट सुरु- मुक्त प्रवाह
▪️विसर्ग- 8899.85 क्युमेक
🔸 *कारधा पातळी* –
▪️ईशारा पातळी- 245.00 मी.🟠
▪️धोक्याची पातळी- 245.50 मी.🛑
▪️ *सद्याची पातळी- 246.17 मी.*🛑 ⬆️
*_धोक्याची पातळी ओलांडलेली आहे._*
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
_(स्रोत:- भंडारा पाटबंधारे विभाग)_
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भंडारा









