सरपंच आरक्षण सोडत सभा आता 14 जुलैला

205

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली,दि.०८: गडचिरोली तालुक्यातील एकूण 51 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या
आरक्षणासाठी नियोजित सोडत सभेचा दिनांक बदलण्यात आला आहे. ही सभा यापूर्वी 9 जुलै 2025 रोजी होणार होती, मात्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ती आता 14 जुलै 2025 (सोमवार) रोजी सकाळी 11.30 वाजता गोंडवाना कला दालन, पोटेगाव रोड, गडचिरोली येथे आयोजित करण्यात येणार आहे.

अवर सचिव, ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या पत्रानुसार, सरपंच आरक्षणाची प्रक्रिया नव्याने सुनिश्चित करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे दिनांक 5 मार्च 2025 च्या अधिसूचनेऐवजी 13 जून 2025 रोजीच्या अधिसूचनेनुसार ही सोडत सभा घेण्यात येत आहे.

तालुका निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार, गडचिरोली यांनी सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य व नागरिकांना या सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

0000