विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली: जिल्ह्यातील देसाईगंज, कुरखेडा,कोरची, चामोर्शी, आरमोरी तालुक्यातील संततधार पावसामुळे दुपारच्या दोन वाजताचे सुमारास जलपातळीत वाढ झाल्यामुळे विविध मार्गावरील वाहतूक ठप्प असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
👉पुरामुळे बंद असलेले मार्ग दि.08.07.2025
वेळ दुपारी 2.00 वा.
1) देसाईगंज सडकअर्जुनी रस्ता प्रमुख राज्यमार्ग -11 तालुका देसाईगंज
2) कुरखेडा मालेवाडा रस्ता राज्यमार्ग 362 ता.कुरखेडा (खोब्रागडी नदी)
3) कोरची बोटेकसा भीमपूर रस्ता राज्यमार्ग 314 तालुका कोरची (भीमपूर नाला)
4) कुरखेडा वैरागड रस्ता राज्यमार्ग 377 तालुका कुरखेडा
5) मांगदा ते कलकुली प्रजिमा 50
6)कढोली ते उराडी रस्ता प्रजिमा 7 ता.कुरखेडा (लोकल नाला )
7) चातगाव रांगी पिसेवाडा रस्ता प्रजिमा 36 तालुका आरमोरी
8) गोठनगडी चांदागड सोनसरी रस्ता प्रजिमा 38 तालुका कुरखेडा
9) कुरखेडा तळेगाव चारभट्टी रस्ता प्रजिमा 46 तालुका कुरखेडा
10) आंधळी नैनपुर रस्ता प्रजिमा 32(सती नदी)
11) शंकरपूर जोगीसाखरा कोरेगाव चोप रस्ता प्रजिमा 1 तालुका देसाईगंज
12) आष्टी उसेगाव कोकडी तुलसी कोरेगाव रस्ता प्रजिमा 49 तालुका देसाईगंज
13) मालेवाडा खोब्रामेंढा रस्ता प्रजिमा 4 तालुका कुरखेडा
14) वैरागड देलनवाडी रस्ता प्रजिमा 8 तालुका आरमोरी
15) चौडमपल्ली चपराळा रस्ता प्रजिमा 53 तालुका चामोर्शी
16) सावरगाव कोटगुल रस्ता प्रजिमा 3 तालुका कोरची
17) अरसोडा कोंढाळा कुरूड वडसा रस्ता प्रजिमा 47 तालुका देसाईगंज इत्यादी मार्गावरील वाहतूक बंद झालेली आहे.
त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गडचिरोली यांनी केले आहे.
————————————-
📣🔴दिनांक 08/07/2025, 13:20 PM 🔴
*केंद्रीय जल आयोगाच्या येवा सूचनेनुसार*
गोसीखुर्द धरणामधुन वैनगंगा नदीपात्रामध्ये पूर नियंत्रणाकरिता सद्यस्थितीमध्ये सुरू असणाऱ्या 11000 क्युमेक्स विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार व टप्प्या-टप्प्याने धरणामध्ये येणार्या येव्यानुसार *12000-16500* क्युमेक्स पर्यंत वाढ होऊ शकते.
तरी नदी पात्रात आवागमन करणाऱ्यांनी काळजी घ्यावी व सतर्क रहावे.
सर्व यंत्रणांनी कृपया आवश्यक ती संपुर्ण खबरदारी बाळगून सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या स्तरावरुन तसे सर्व संबंधितांना त्वरित सुचीत करावे असे आवाहनही केले आहे.
—++++——————
फोटो साभार:मेटा एआय









