Heavy rainfall update : नागरिकांनी सतकर्तता बाळगावी

229

जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे आवाहन

अतिवृष्टीमुळे पाणी पातळीत होताहे वाढ

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली:आज दिनांक 8 जुलै 2025 रोजी,सकाळी 5:00 वाजता 7000 क्युमेक्स विसर्ग सुरू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे पाण्याचा येवा वाढत असल्याने धरणातील विसर्ग आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने *8500 ते 9500 क्युमेक्स* पर्यंत वाढवला जाऊ शकतो.अशी माहिती गोसेखुर्द प्रकल्प स्थळावरुन समाजमाध्यमावर प्रसारीत करण्यात आलेल्या संदेशातून दिली आहे.

त्यामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्याने नदीकाठावरील गावांतील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी व सतर्क राहावे. नदीपात्रात आवागमन करु नये असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष गडचिरोली यांनी केले आहे.

धरण विसर्ग सद्य:स्थिती
दिनांक: 08/07/2025, सकाळी 7.00 वा.
———–
*गोसीखुर्द प्रकल्प* – (26.63%)
▪️गेट सुरु- 33 पैकी 33 गेट
▪️विसर्ग- 8030 क्युमेक्स (2,83,577 क्युसेक्स)

*चिचडोह बॅरेज* – (Free Flow)
▪️गेट सुरु- 38 पैकी 38 गेट
▪️विसर्ग- 2835 क्युमेक्स (1,00,111 क्युसेक्स)

*निम्न वर्धा प्रकल्प* – (52.12%)
▪️गेट सुरु- 0 गेट
▪️विसर्ग- 0 क्युमेक्स

*श्रीराम सागर प्रकल्प* – (23.88%)
▪️गेट सुरु- 0 गेट
▪️विसर्ग- 0 क्युमेक्स

*श्रीपदा येलमपल्ली प्रकल्प* – (43.27%)
▪️गेट सुरु- 0 गेट
▪️विसर्ग- 0 क्युमेक्स

*मेडीगड्डा बॅरेज* – (Free Flow)
▪️गेट सुरु- 85 पैकी 85 गेट
▪️विसर्ग- 3365 क्युमेक्स (1,18,850 क्युसेक्स)
—————————————-

प्रमुख नद्यांची पाणी पातळी सद्य:स्थिती
जिल्हा- गडचिरोली
🗓️ *दिनांक*: 08/07/2025, सकाळी 7.00 वा.
———–
*वडसा साखरा (वैनगंगा नदी)* –
▪️धोका पातळी- 216.20 मी.
▪️इशारा पातळी- 215.20 मी.
▪️सध्याची पातळी- 210.33 मी.
—–
*आष्टी (वैनगंगा नदी)* –
▪️धोका पातळी- 150.92 मी.
▪️इशारा पातळी- 149.42 मी.
▪️सध्याची पातळी- 146.52 मी.
—–
*अहेरी गुडम (प्राणहिता नदी)* –
▪️धोका पातळी- 121.00 मी.
▪️इशारा पातळी- 120.00 मी.
▪️सध्याची पातळी- 114.66 मी.
—–
*कालेश्वरम (गोदावरी नदी)* –
▪️धोका पातळी- 104.75 मी.
▪️इशारा पातळी- 103.50 मी.
▪️सध्याची पातळी- 97.58 मी.
—–
*पाथागुडम (इंद्रावती नदी)* –
▪️धोका पातळी- 96.75 मी.
▪️इशारा पातळी- 95.50 मी.
▪️सध्याची पातळी- 92.45 मी.
—–
(सौजन्य:- गडचिरोली पाटबंधारे विभाग)
——
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली”
——————————–
🌧️

🚛पुरामुळे बंद असलेले मार्ग दि.08.07.2025 

वेळ सकाळी 8.00 वा.

1) कुरखेडा मालेवाडा रस्ता राज्यमार्ग 362 ता.कुरखेडा (खोब्रागडी नदी)

2) कोरची बोटेकसा भीमपूर रस्ता राज्यमार्ग 314 तालुका कोरची (भीमपूर नाला)

3) कुरखेडा वैरागड रस्ता राज्यमार्ग 377 तालुका कुरखेडा 

4) मांगदा ते कलकुली प्रजिमा 50 

5)कढोली ते उराडी रस्ता प्रजिमा 7 ता.कुरखेडा (लोकल नाला )

6) चातगाव रांगी पिसेवाडा रस्ता प्रजिमा 36 तालुका आरमोरी 

7) गोठनगडी चांदागड सोनसरी रस्ता प्रजिमा 38 तालुका कुरखेडा

8) कुरखेडा तळेगाव चारभट्टी रस्ता प्रजिमा 46 तालुका कुरखेडा 

9) आंधळी नैनपुर रस्ता प्रजिमा 32(सती नदी)

10) शंकरपूर जोगीसाखरा कोरेगाव चोप रस्ता प्रजिमा 1 तालुका देसाईगंज इत्यादी मार्गावरील वाहतूक ठप्प असल्याची माहिती मिळाली आहे.

———————————++————-++++