निधन वार्ता

304

श्रीमती सिंधुबाई ठवकर यांचे निधन

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली): नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील धापर्ला येथील रहिवासी सौ.सिंधुबाई जीवनराव ठवकर (६२ वर्षे)यांचे आरमोरी येथे अल्पशा आजाराने आज दिनांक ६ जुलैला निधन झाले.

त्या सिताबर्डी परिसरातील व्यावसायिक विलास बोरकर यांच्या सासुबाई तर काशिनाथजी पोटफोडे यांच्या भगिनी होत्या.

त्यांच्या पश्चात पती,मुलगी, जावई व बराच मोठा आप्त परिवार आहे.

त्यांच्या पार्थिवावर उद्या दिनांक ७ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता गाढवी नदीचे तिरावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.