महाराष्ट्र पोलीस विभाग, गडचिरोली जिल्हा पोलीस दल व प्रोजेक्ट उडान यांचा पुढाकार
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली),दि.५जुलै:महाराष्ट्र पोलीस विभाग आणि गडचिरोली पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रोजेक्ट उडॉन व यशोरथ सिरीज मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षेचा पेपर क्रमांक 7 हा श्री संताजी प्रशासकीय महाविद्यालय, अंबामाता महिला महाविद्यालय, आणि श्री किसनराव खोब्रागडे महाविद्यालयात आरमोरी येथे आज दिनांक 5 जुलै 2025 रोजी घेण्यात आला.सदर सराव प्रश्नपत्रिका ११८ विद्यार्थ्यांनी उत्साहात व नियोजीत वेळेत सोडविली.
सदर पेपर हा गडचिरोली जिल्ह्यातील युवकांसाठी यशोरथ सिरीज महाराष्ट्र यांच्या माध्यमातून तयार करण्यात आला होता. भविष्यात होणारी पोलीस भरती ,तलाठी भरती , वनरक्षक भरती या भरतीमध्ये जास्तीत जास्त युवक, युवती हे सहभागी झाले पाहिजे या दृष्टीने आणि त्यांच्या बुद्धिमत्तेत वाढ होण्याच्या दृष्टीने हा सराव पेपर क्रमांक 7 चे आयोजन करण्यात आले होते.या सराव पेपरला जवळपास 118 विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी सहभाग नोंदविला.
विद्यार्थ्यांनी दिल्या अनुभव पूर्ण प्रतिक्रिया
या पेपरच्या माध्यमातून आम्हा विद्यार्थ्यांची लेखी प्रश्नपत्रिका सराव होणार आणि त्यामुळे आम्हाला भविष्यात देण्यात येणाऱ्या भरतीसाठी फायदा होणार या उद्देशाने आम्ही पेपर देत आहोत अशी प्रतिक्रिया येथील परीक्षार्थींनी दिल्या.
सदर महाविद्यालयात आत्तापर्यंत दरवर्षी जवळपास आठ ते नऊ हे सराव पेपर घेण्यात आले आहेत आणि त्यामुळेच अनेक विद्यार्थी हे पोलीस ,वनरक्षक एस आर पी एफ, मिल्ट्री आणि तलाठी यामध्ये भरती पात्र झाले आहेत.सदर पेपरचा फायदा त्यांना झालेला असल्याने भविष्यात सुद्धा असे पेपर या महाविद्यालयात घेण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. या पेपरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अगदी मोफत मध्ये बुद्धिमत्तेचा सराव होणार असल्याने अनेक विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत.
सदर सराव प्रश्नपत्रिका यशस्वीतेसाठी साठी आरमोरी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून पोलीस निरीक्षक कैलास गवते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अशोक ठाकरे ,पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत नाकतोडे, महाविद्यालयाचे प्रा.दौलत धोटे, प्राचार्य फाल्गुन नरूले, प्राचार्य विशाल रंगारी,प्रा. मोहन रामटेके, प्रा. कमलाकर भोयर व महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.









