पाऊसपाणी: येत्या २४ तासात पाऊस कुठे पडेल व धरण विसर्ग सद्यःस्थिती

96

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

गडचिरोली: गेल्या तीन दिवसांपासून संततधार पावसाने गडचिरोली जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे.यात सरीवर सरी बरसल्या.आद्रा नक्षत्रात पाऊस धुवांधार कोसळलेला आहे.त्यामुळे जिल्ह्यातील ब-याच तालुक्यातील दळणवळण यंत्रणा सद्यःस्थितीत दिनांक २जुलै २०२५ पर्यंत ठप्प झाल्याचे चित्र दिसून येत आहे.संबंधित पाऊसपाणी संदर्भात भारतीय हवामान विभाग नागपूर तसेच गडचिरोली पाटबंधारे विभाग गडचिरोली यांचे कडून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गडचिरोली द्वारे दिनांक २ जुलैला प्राप्त झालेली ठळक माहिती उपलब्ध करीत आहोत.

धरण विसर्ग सद्य:स्थिती
दिनांक: 02/07/2025, स. 8.00 वा.
———–
गोसीखुर्द प्रकल्प – (23.69%)
गेट सुरु- 0 गेट
विसर्ग- 160 क्युमेक्स (पॉवर हाऊस द्वारे)

चिचडोह बॅरेज- (34.09%)
गेट सुरु- 38 पैकी 9 गेट सुरू
विसर्ग- 1914 क्युमेक्स (67610 क्युसेक्स)

निम्न वर्धा प्रकल्प – (51.56%)
गेट सुरु- 0 गेट
विसर्ग- 0 क्युमेक्स

श्रीराम सागर प्रकल्प – (20.37%)
गेट सुरु- 0 गेट
विसर्ग- 0 क्युमेक्स

श्रीपदा येलमपल्ली प्रकल्प – (42.62%)
गेट सुरु- 0 गेट
विसर्ग- 0 क्युमेक्स

मेडीगड्डा बॅरेज – (Free Flow)
गेट सुरु- 85 गेट
विसर्ग- 354 क्युमेक्स (12500 क्युसेक्स)
—————————————–महत्वाची सुचना

भारतीय हवामान विभाग, नागपूर केंद्र यांचेद्वारे आज दिनांक 02 जुलै, 2025 रोजी दुपारी 1.15 वाजता प्राप्त संदेशानुसार पुढील 24 तासाकरीता जिल्ह्यात बहुदा सर्वत्र *मध्यम ते मुसळधार* पावसाचे संकेत दिलेले असून जिल्हयातील *एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस आणि विजेच्या कडकडाटासह मेघगर्जनेची शक्यता* असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
कृपया याची नोंद घेण्यात यावी.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, गडचिरोली

—————————————-

# पुढील २४ तासांत छत्तीसगड राज्यातील बलरामपूर, *बस्तर, विजापूर,* बिलासपूर, *दंतेवाडा,* गरियाबंद, गौरेल्ला पेंद्र मारवाही, जशपूर, *कांकेर,* कोंडागाव, मुंगेली, *नारायणपूर,* सुकमा, सूरजपूर, सुरगुजा येथे काही ठिकाणी *मुसळधार पाऊस* पडण्याची शक्यता आहे.

Issued by : IMD Raipur
Issued on : 02 Jul, 13:48
Validity Time : 03 Jul, 13:48

🌧️पुढील २४ तासांत आदिलाबाद, भद्राद्री कोठागुडेम, हनुमाकोंडा, जयशंकर, कामारेड्डी, खम्मम, कुमुराम भीम, महबुबाबाद, मंचेरियल, मेडक, मुलुगु, निर्मल, निजामाबाद, वारंगल येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

*Issued by : IMD Hyderabad*
Issued on : 02 Jul, 14:28
Validity Time : 03 Jul, 08:28

येत्या २४ तासांत गडचिरोली जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आयएमडी नागपूरने वर्तवला आहे, तसेच काही ठिकाणी मुसळधार पाऊस, गडगडाटी वादळे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.त्यामुळे नागरिकांनी जबाबदारीने आवागमन करावे.अधिक जोखीम स्विकारून नदी,नाले यांच्या पाणी प्रवाहातून मार्गक्रमण करु नये असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गडचिरोली तर्फे असे आवाहन करण्यात आले आहे.