IMP Information IBPS exam : परिक्षार्थींना महत्वाची सूचना

120

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली : नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई गट-ड संवर्गात २८४ पदे भरती करीता दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजीच्या वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर भरती प्रक्रिया पुर्ण करण्याकामी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्विकारण्याकरीता तसेच ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आयोजन करण्याकरीता आय.बी.पी.एस. (इंस्टीट्यूट ऑफ बँकींग पर्सोनेल सिलेक्शन) कंपनीस नियुक्त केले आहे. व त्यानुसार आय.बी.पी.एस. कडून दिनांक २२ एप्रिल २०२५ ते दिनांक १६ मे २०२५ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरुन घेण्यात आलेले आहेत.

आय.बी.पी.एस. च्या संकेतस्थळावर यशस्वीरित्या भरलेले अर्ज व पात्र असलेल्या उमेदवारांची दि.०१ जुलै २०२५ ते ०८ जुलै २०२५ या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे.

सदर परीक्षेचे प्रवेशपत्र/हॉल तिकिट उमेदवारास त्यांनी नोंदणी केलेल्या ई-मेलवर आय.बी.पी.एस. कडून पाठविण्यात येणार आहे.

सदर परिक्षेकरीता विभागाकडून कोणत्याही इतर एजन्सीची वा मध्यस्थाची नेमणूक करण्यात आलेली नाही. जर याबाबत कोणती व्यक्ती, संस्थेकडून, मध्यस्थ अथवा तशी बतावणी करण्यात येत असल्यास अशा व्यक्ती वा संस्थेपासून उमेदवारांनी कृपया सावध राहावे असे आवाहन नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे करण्यात येत आहे.

0000

फोटो साभार: गुगल

Previous article📚दिनविशेष ✍️
Next article🌞दिनविशेष !🌼
Vidhayak Deepstambha
विधायक दीपस्तंभ ऑनलाइन वेबसाईट ,न्यूज ब्लॉग आणि यूट्यूब चॅनल आपल्या परिसरातील प्रत्येक घटना , वास्तव टिपणा - या निःपक्ष बातम्या , काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज अपटेड न्युज ब्लॉग समाजकारण , राजकारण , साहित्य , नाटक , सिनेमा , पुस्तक , लेखक , कलाकार , ग्लोबल ते लोकल, अर्थ , व्यापार , फॅशन यावर प्रकाश टाकणार. या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज चॅनेल आहे . वेळोवेळ